मुंबई : राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून मागील ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या कामांचे ऑडिट केले जाणार आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण खात्याचा आढावा केंद्र सरकारकडून घेण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात राजकीय संघर्ष सुरू असतानाच ही महत्त्वाची माहिती समोर आलीय. Maharashtra Pollution Board Audit of Aditya Thackeray’s Environment Ministry from the Centrel government
शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाबरोबरच शिवसेनेचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंतही पोहोचला आहे. बंडखोरी केल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आधी निष्ठा यात्रा आणि त्यानंतर शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यात आता हा ऑडिटचा निर्णय आला आहे. आता केंद्राने ऑडिट सुरू केल्यानं याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589146919429708/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
केंद्राकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर विशेष भर देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचं केंद्र सरकारकडून ऑडिट केलं जाणार आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाशी संबंधित कामं ऑडिटच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या कारभाराबाबत केंद्राने मुंबईतील मुख्यालयापासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात केंद्र सरकारने ऑडिट सुरू केलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
□ आदित्य ठाकरेंनी उभारलेला ‘तो’ पूल गेला वाहून
#नाशिक #nashiknews #AadityaThackeray #rain #bridge #पूल
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे हा पूल उभारण्यात आला होता. परंतु, आता हा पूलच वाहून गेल्याने नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा पूल उभारण्यात आला होता. या पूलाच्या उद्घाटनासाठी ते स्वतः तिथे गेले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589090509435349/