सोलापूर :- एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्म प्रकरणी आपणास अटक होईल या भीतीने माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दाखल केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर होऊन त्यांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. Ex-BJP District President Shrikant Deshmukh is now relieved; Next hearing on Thursday
यात हकीकत अशी की, मुंबई येथील एका महिलेने श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्नाचे अमिष दाखवून मुंबई,सोलापूर,पुणे,सांगली इत्यादी ठिकाणी त्यांच्यावर दुष्कर्म केले,मात्र लग्न केले नाही अशा आशयाची फिर्याद प्रथमता पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
पुढे पुणे पोलिसांनी ती सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग केली व पोलीस श्रीकांत देशमुख यांना अटक करणेसाठी त्यांचे मागावर होते. त्यामुळे आपणास त्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा अर्ज एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत दाखल केला.
सुनावणीचे वेळी एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात सकृत दर्शनी दुष्कर्माचा गुन्हा आकर्षित होत नाही. अर्जदार हा कोठेही पळून जाणार नाही व तो न्यायालयाचे आदेशाचे पालन करेल असा युक्तिवाद केला,त्यावरून न्यायाधिशांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश पारित केला.
मात्र पोलीस ठाण्यात दिनांक 26 जुलै 27 जुलै रोजी हजेरी देण्याचा आदेश केला व पुढील सुनावणी गुरूवारी (ता. 28 जुलै) होणार आहे. यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे, आकाश गायकवाड मुंबई, बाबासाहेब जाधव, विनोद सूर्यवंशी, अभिजीत इटकर, निशांत लोंढे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ molestation शिवसेना पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
इंदापूर : इंदापूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बोंद्रे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर फोटो काढताना समोर उभ्या असलेल्या महिलेच्या खांद्यावर बोंद्रे यांनी हात टाकला. त्यामुळे संबंधित महिलेने इंदापूर पोलीसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तसेच गटबाजीतून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बोंद्रे यांनी केला आहे.
विशाल बोंद्रे हे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आहेत. परवा संध्याकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सचिन अहिर यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक झाली आणि काल विशाल बोन्द्रे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. इंदापूरमध्ये 14 जुलै रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक संपल्यावर ग्रुप फोटो काढण्यासाठी उभे राहिले असता विशाल बोन्द्रे हे महिलेच्या पाठीमागे उभे राहिले आणि महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावरून महिलेने विशाल बोन्द्रे यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी विशाल बोन्द्रे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विशाल बोंद्रे यांनी गटबाजीतून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप संबंधित महिलेवर केला आहे. जर 14 जुलै रोजी हा प्रकार झाला होता, तर ही महिला इतक्या दिवस शांत का बसली? असा देखील सवाल बोन्द्रे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे इंदापूरमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.