मुंबई : राज्यात सरकार स्थापन होऊन 25 दिवस झालेत तरी अजून मंत्रीमंडळ स्थापन झालेले नाही. जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसात राज्यातील आठ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड येथील 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. There is no minister in the state, farmers are in the wind; Agriculture Minister could not be found in 24 days, 89 farmers committed suicide
राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तेचा लपंडाव सुरु आहे. बंडखोरी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, कोण गद्दार, कोण निष्ठावान, कुणाला कोणतं निवडणूक चिन्ह अशा राजकारणात मात्र राज्यातला शेतकरी वाऱ्यावर पडला आहे. आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर राजकारण गेले आहे. राज्यातील शेतकरी व जनता वाऱ्यावर असल्याचे चित्र पहिल्यांदा पाहावयास मिळत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
आमदार खडसे यांनी सांगितले, की पंचवीस दिवस झाले तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या ठिकाणी मंत्रिमंडळ असते तर लोकांच्या समस्या सुटण्यास मदत झाली असती. शासनाकडून नुकसानग्रस्त जनतेला काही मदत करता आली असती. तसे न होणे हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधीही राज्याची परिस्थिती प्रभावीपणे मांडू शकतो.
राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने प्रशासनाची जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेली आहे. हे अधिकारी आपले काम त्यांच्या चाकोरीत राहूनच करतात. सध्या महाराष्ट्रामध्ये अति पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसान बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन जवळपास 25 दिवस उलटले आहेत. मात्र जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये झालेल्या पावसात राज्यातील आठ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून तेथील 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भात जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589037722773961/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/589055542772179/
लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच, बळीराजाला राग आला तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. शिंदे सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलं अशी खडसेंनी टीका केली आहे. सध्या राज्यात जनता अडचणीत असताना सरकारकडून मदतीची अपेक्षा असते, मात्र लोकप्रतिनिधी नसल्यानं सरकारनं राज्य प्रशासनाच्या हवाली करून जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याची टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली आहे.
□ मंत्रीमंडळ नसल्याने प्रशासनाच्या हाती हवाला
सध्या राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण होऊन नुकसान झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, अशा वेळी सरकारनं जनतेला तातडीनं मदत जाहीर करणं अपेक्षित असते. मात्र राज्यात सध्या मंत्री मंडळच अस्तित्वात नसल्याने सरकारने सर्व काही प्रशासनाच्या हाती हवाला केले आहे, प्रशासन काम करीत असले तरी ते एका चौकटीत राहून काम करीत असतात,राज्य अडचणीत असताना लोकप्रतिनिधी नसल्याने सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचं चित्र राज्यात सध्या पाहायला मिळत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकार वर केली आहे.
□ महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्रीविना
शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं टीकांची तोफ डागली जात आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्यानं सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येत आहे. एकीकडे राज्यात पावसानं धुमशान घातलं असून अद्याप राज्याला कृषीमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री राज्यात नाही. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसानं हिरावून घेतला आहे. पूरग्रस्त भागांचे पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मात्र ही मदत कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.
□ आत्महत्या सत्र चालूच, राज्याला २४ दिवसांत कृषिमंत्री मिळाला नाही
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लगेचच हे सरकार सर्वसामान्य जनतेचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगितले होते. कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही असेही ते म्हणाले होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, असा संकल्प केल्यानंतरही शिंदे सरकारच्या 24 दिवसांच्या काळातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये राज्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही २४ दिवस उलटले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याला अजूनही कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर करूनही राज्याला २४ दिवसांत कृषिमंत्री मिळालेले नाही. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर इतर कोणत्याही प्रकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हे दोघेच सरकार चालवत आहेत, असा आरोपही विरोधकांकडून झाला आहे.
□ आदित्य ठाकरेंनी उभारलेला ‘तो’ पूल गेला वाहून
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे हा पूल उभारण्यात आला होता. परंतु, आता हा पूलच वाहून गेल्याने नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा पूल उभारण्यात आला होता. या पूलाच्या उद्घाटनासाठी ते स्वतः तिथे गेले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588972942780439/