सोलापूर : राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तसे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीला गळती लागणार का? असा प्रश्न निर्माण होतो. असे झाल्यास राष्ट्रवादीला सोलापूरात मोठे खिंडार पडून शकते. Why are 2 big leaders of NCP at the throat of BJP? Why will NCP fall after Shiv Sena? Babanrao Shinde Rajan Patil
दरम्यान, बबनराव शिंदे आणि राजन पाटील हे भाजपमध्ये जाणार का याकडे माढा आणि मोहोळकरासह सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे चर्चा होत आहे. अधिक तपशील समजू शकला नाही. बबनराव शिंदे यांनी भेटीनंतर विचारलेल्या प्रश्नाला नो कमेंट असे उत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण हे केवळ शिवसेना, शिंदे गट आणि भाजप पक्षापर्यंतच मर्यादित होते. आता हे राजकारण जिल्हापातळीवर पोहचले आहे. आता या बंडाचे वादळ सोलापूरपर्यंत पोहचते का, अशी चर्चा होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589019429442457/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/588972942780439/
शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसाकाठी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हे भाजपाच्या संपर्कात आता येत आहेत. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी होण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बबनराव शिंदे यांचे माढा मतदार संघात तर राजन पाटील यांचे मोहोळ मतदार संघात राजकीय वजन चांगले आहे. शिवाय हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे असून गेल्या काही दिवसांमध्ये यांच्यात पक्षाविषयी कमालीचि नाराजी पसरली आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. आता थेट दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांचीच त्यांनी भेट घेतली असून बंद दरवाज्यात चर्चा झाली आहे.
आमदार बबनराव शिंदे आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत्या पण आता भेट घेतल्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का हे आता पहावे लागणार आहे.
राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या या भूमिकेनंतर सोलापूरच्या राजकारणाचे चित्र काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.आजपर्यंत राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केले आहे, करत आलो आहे आणि करत राहणार आहे. आमचे नेते पवारसाहेब यांनी माझे कोणतेही काम थांबवले नाही आणि मी सांगेल ती कामे त्यांनी केलेली आहेत. फोनवरून सुद्धा ते माझी कामे करत असतात. त्यामुळे मी पक्ष सोडून का जाऊ, असा प्रतिसवाल राजन पाटील यांनी उपस्थित केला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली होती. सत्तांतरानंतर चर्चा अधिक जोर धरु लागल्याने पाटील हे भाजपात सहभागी होणारच असेच वातावरण निर्माण झाले होते.
□ मी शिवसेनेतच- अर्जुन खोतकर
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जालना शिवसेनेचे नेते तसेच माजी मंत्री अर्जुन खोतकर हे सुद्धा शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
अर्जुन खोतकर यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते आता शिंदे गटात सामील झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट झाल्याची अधिकृत सूत्रांनी दिली होती.
अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे खोतकर शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता खोतकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला आलो होतो. मी एकनाथ शिंदे गटात गेलेलो नाही. मी शिवसैनिक असून शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ आहे, असं त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588909476120119/