अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मृत्यू व सेवा निवृत्त व झालेले आहेत. त्या ठिकाणी नव्याने कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. तरीही वर्षानुवर्षे त्या कर्मचाऱ्यांचे नावे बँक खात्यात वेतन जमा करण्याचे महाप्रताप जिल्हा परिषद पाणी पुरवठाविभागाकडून होत आहे. या अजब कारभाराबाबत कर्मचारी संघटनेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. Pratap of Solapur Zilla Parishad: Salary deposited in the name of deceased, retired employees over the years
अक्कलकोट तालुक्यात ११७ ग्रामपंचायत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी पाणी पुरवठा, लिपिक म्हणून शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायत स्तरावर पाणी शुध्दीकरण करणे, पाण्याचे गुणवत्ता तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळेला पाणी नमुने नेऊन देणे, शुद्ध पाणी पुरवठा होण्याकरिता शासनाने दिलेल्या नियमानुसार कामकाज करणे इत्यादी कामाकरिता ग्राम पंचायत स्तरावर करावे लागते. यासाठी जलसुरक्षा पाणी पुरवठा कर्मचा-यांना नेमतात व त्यांचा मानधन गावातली पाण्याच्या मुख्य साधन म्हणजे (विहीर,विंधन विहीर, हातपंप) संख्यावर अवलंबून असतात.
तो मानधन कार्यरत जलसूरक्षक खात्यावर जमा करणे आवश्यक असते. ते केले जातात. मयत व सेवानिवृत्त जलसुरक्षक यांची माहिती वेळोवेळी अद्यावत केले जाते. सदर मानधन चक्क तीन ३ वर्षापूर्वी मयत झालेले व ५ पाच वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्याच्या खात्यावर आजही जमा करण्यात येत आहे. हा कसला कारभार असे ओरड कर्मचारी वर्गातून होत आहे. एकदा नाहीतर अनेक वेळेस झालेले आहे. यामुळे कर्मचारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591043892573344/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर जिल्हा ग्राम पंचायत कर्मचारी संघटना उपाध्यक्ष, अक्कलकोट तालुका अध्यक्ष हुवणा पुजारी, तालुका सचिव लक्ष्मीकांत कोळी यांनी याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार व तोंडी विनंती केलेले आहे. मात्र काहीच फरक पडलेले नाही.
□ हे आहेत सेवा निवृत्त व मयत कर्मचारी
बोरोटी खु येथे इब्राहिम पठाण यांचा मृत्यू झाला असून त्या ठिकाणी सूर्यकांत कोळी कार्यरत आहेत. पठाण यांच्या बँक खात्यावर ३,३२० रुपये, रुड्डेवाडी येथील इरणा करवीर यांनी सेवानिवृत्त झाले असून त्या ठिकाणी मल्लिनाथ करवीर हे कार्यरत आहेत. इरणा यांच्या खात्यावर २,३८० रुपये जमा करण्यात आले आहे.
आंदेवाडी ब्रू- येथील सैपन जमादार हे सेवानिवृत्त झाले असून त्या ठिकाणी प्रकाश येळमेली कार्यरत आहेत. सैपन यांच्या खात्यावर १,९८० रुपये जमा झालेले आहेत. बऱ्हाणपूर येथील शिवाजी बनसोडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी मंजुनाथ बनसोडे कार्यरत आहेत. शिवाजी यांच्या खात्यावर २,३६० रुपये जमा करण्यात आले आहेत.
》 मराठवाड्यात गेल्या 7 महिन्यात 515 शेतकऱ्यांची आत्महत्या
मुंबई : मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 7 महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 515 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ज्यात सर्वाधिक 153 शेतकरी बीड जिल्ह्यातील आहेत. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. त्याचा मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना व पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला. मराठवाड्यातील 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590979069246493/