मोहोळ : मोहोळ विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षिरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षिरसागर व माढ्याचे उमेदवार संजय कोकाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला व तसे पत्र क्षिरसागर व कोकाटे यांनी दिले. Kshirsagar of Mohol and Kokate of Madha entered the Shinde group
माढा विधानसभेचे उमेदवार संजय कोकाटे यांना ७८ हजार मते मिळाली होती. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून नागनाथ क्षीरसागर यांना ७० हजार मते मिळाली होती. सोमेश क्षीरसागर हे नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात संजय कोकाटे व सोमेश क्षीरसागर या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपल्या भूमिकेशी सहमत असल्याचे पत्र देवून शिंदे गटात सामील झाले.
हिंदुत्व व विकास ही मी घेतलेली भूमिका आपण स्वीकारून माझ्यासोबत येण्याचा आपण दोघांनी जो निर्णय घेतला आहे. त्याचे मी स्वागत करतो. तर आत्ता आपले सर्वांचे सरकार आहे. जरी मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो असलो तरी तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात. या सत्तेचा उपयोग राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामासाठी झाला पाहिजे. यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावा सरकार , शासन म्हणून जी ताकद पाहिजे ती सर्व मी आपल्या पाठीशी उभी करेन, असे आश्वस्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असल्याची माहिती सोमेश क्षीरसागर यांनी दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591075842570149/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मोहोळ व माढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
मोहोळ व माढा विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे अनेक विकासाचे प्रश्न , कामे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावण्यासाठी व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे या महान विभूतींचे प्रखर हिंदुत्ववादी विचाराची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली आहे. त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत जातो आहोत.
आज दोन्ही विधानसभा मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधींनी कितीही कोटींच्या विकासकामांच्या गप्पा मारल्या तरी अनेक गावांत जाण्यासाठी रस्ते नाहीत. अनेक गावांत पायाभूत मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मुख्यमंत्री महोदयांनी तुम्ही मुख्यमंत्री आहात जा तुमच्या मतदारसंघात मोठ्या आत्मविश्वासाने विकासकामे करा जनतेची सेवा करा याचे फळ येणाऱ्या काळात जनता तुम्हाला नक्कीच देईल, असे आश्वस्त केले आहे. त्यामुळे आमदार तानाजी सावंत , प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना वाढविणार असल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591052879239112/