मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. ईडीने त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने कोर्टात केला. दरम्यान राऊत यांना हृदयविकाराचा त्रास आहे. ते चौकशीत सहकार्य करत आहेत, असा युक्तीवाद संजय राऊत यांच्या वकिलांनी केला आहे. Shiv Sena leader Sanjay Raut remanded till August 4, bail tough as per provisions of PML Act
संजय राऊतांची रात्रीच्या वेळी चौकशी केली जाऊ नये अशीही विनंतीही करण्यात आली. यावर ईडीने सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात असं सांगितलं. तसंच रात्री १०.३० नंतर त्यांची चौकशी न करण्याची हमी दिली. पीएमएलच्या कायदातील तरतुदीनुसार संजय राऊत यांना जामिन मिळाला नाही पण ईडीची कोठडी मिळाली. या कायद्यातल्या तरतुदीच अशा आहेत की जामिन मिळणे फार कठीण आहे. जामिनीसाठी दोन अटी आहेत. त्या अटींची पुर्तता होत नसल्याने अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. संजय राऊत यांच्यासाठीही काळ कठीण आहेत.
संजय राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. कोर्टात युक्तीवादादरम्यान ईडीनं संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी मागितली. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी वकिलांनी म्हटलं, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी एक रुपयाचीही गुंतवणूक केलेली नाही. पण त्यांना ११२ कोटी रुपये मिळाले. चौकशीतून हे समोर आलं आहे की, यांपैकी १.६ कोटी रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593537158990684/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/593554472322286/
या पैशांतून संजय राऊत यांनी अलिबागमधील किहिम बीचवर एक भूखंड विकत घेतला होता. हा भूखंड स्वप्ना पाटकर यांच्या नावे घेण्यात आला, असं चौकशीतून समोर आलं आहे. तसेच प्रवीण राऊत हेच संजय राऊत यांच्यावतीनं व्यवहार करत होते.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला होता. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं होतं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.
या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना चार वेळा समन्स बजावण्यात आलं पण ते यांपैकी फक्त एकदाच ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. याकाळात त्यांनी महत्वाचे साक्षीदार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या प्रकरणी सखोल चौकशीसाठी संजय राऊत यांना ८ दिवसांची कोठडी देण्यात यावी.
संजय राऊत यांच्यावतीने वकील अड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी म्हटलं, संजय राऊतांची अटक ही राजकीय हेतूने झाली आहे. त्यांना हृदयासंदर्भात आजार आहे, त्यांच्यावर यासंबंधी शस्त्रक्रिया देखील झालेली आहे. यांसंबंधीची कागदपत्रे यापू्र्वीच कोर्टात सादर करण्यात आली आहेत.
संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हर्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593547852322948/