सोलापूर : सोलापूर आकाशवाणीचे संध्याकाळच्या प्रसारणातील कार्यक्रम १ जुलैपासून बंद झाले आहेत. एकूण ५.५३ पासून ते रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत चालणाऱ्या या प्रकरणात स्थानिक कार्यक्रमांसाठी केवळ दोन तास तीस मिनिटांचा वेळ उपलब्ध करून दिला आहे. Solapur AIR should not become BSNL; Voice of Dignitaries in Air Defense Action Committee
प्रसारभारतीच्या पुनर्निर्माण अर्थात रीकन्स्ट्रक्शनच्या नावे तसेच बजेट नसल्याच्या कारणावरून हे प्रसारण बंद झाले आहे. दुपारी १२ नंतर रात्री ११ पर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जात आहेत. यामध्ये संध्याकाळच्या प्रकरणात फक्त गावकरी मंडळाचा कार्यक्रम हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. इतर स्थानिक कार्यक्रम पूर्वी व्हायचे दोन्ही प्रसाराणात व्हायचे आता बंद झाल्याने सोलापूर आकाशवाणी ज्ञान, मनोरंजनाबरोबरच माहितीही द्यायची ती आता फक्त यांत्रिक सहक्षेपक बनली आहे. हे वास्तव लवकरच दिसणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रसारभारतीने कार्यक्रम बंद करून मराठी माणसांवर आणि मराठी अस्मितेवर घाला घातला आहे. पुढे जाऊन सोलापूर आकाशवाणीचे बीएसएनएल होऊ नये यासाठी सोलापूरकरांनी वेळीच लढा उभारला पाहिजे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी या कृती समितीच्या बैठकीत अंध श्रोत्यांनी बोलावून दाखवली.
आकाशवाणी बचाव कृती समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात मराठी अस्मितेसाठी आणि आकाशवाणी कार्यक्रम पूर्ववत होण्यासाठी सोलापुरातील लेखक, साहित्यिक , समीक्षक, विचारवंत, कलावंत, कामगारवर्ग आणि आकाशवाणीप्रेमी श्रवणनिष्ठ असे समाजातील सर्वच घटकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, राजकारण या क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593547852322948/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/593537158990684/
व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, प्रा . एम. आर. कांबळे, रेकॉर्ड कलेक्टर असोसिएशनचे मोहन सोहनी , ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ.राजशेखर शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर, पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोळकर, प्रमुख कार्यवाह मसाप शाखा जुळे सोलापूरचे कवी गिरीश दुनाखे आदी उपस्थित होते.
प्रारंभी आकाशवाणी प्रासंगिक उद्घोषक नितिन बनसोडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक यानंतर उपस्थित आकाशवाणीतल्या प्रासंगिक उद्घोषक यांनी आपली ओळख करून देत आत्तापर्यंत केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थित सर्व आकाशवाणीप्रेमींना दिली.
त्यानंतर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आकाशवाणी बचाव कृती समितीच्या वतीने पुढील नियोजन करण्यात आले. मराठी भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधीसह भाषाप्रेमी अधिकारी यांना निवेदने देण्याचे ठरले.
याप्रसंगी मसापचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, शिवाजी भोसले ,अनंत जोशी, व्यंकटेश पवार, बाबुराव माळी, अंध श्रोते प्रभाकर कदम, आनंद देशपांडे,चित्रकार हेमंत कपूरे , सुरेश वालवडकर, माधुरी देशपांडे हस्ताक्षर तज्ञ अभिजीत भडंगे, कवी गिरीश दुनाखे ,श्रोते नकुल भालेकर, विलास कस्तुरे, शिवसेनेच्या भक्ती मधुकर जाधव, हिंदीचे डॉ. बंडोपंत यशवंत पाटील, केशव कांबळे, इम्तियाज शेख, निवृत्त शिक्षक सुधीर गाडगीळ, किरण गायकवाड, सदानंद पोद्दार, अंध श्रोते सैपन शेख, अर्जुन दळवी, प्रा.अमित बनसोडे, प्रणव पात्रे, शिवाजी सलगर, ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, प्राजक्ता करवंदे, प्रमोद झिंजुर्डे यांच्यासह श्रोते, आकाशवाणीचे प्रासंगिक उद्घोषक उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593124385698628/