जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. नागाला कितीही दूध पाजले तरी चावायचं तो चावतोच, असं ते म्हणाले. तसेच या सर्वांना निष्ठेच दूध पाजलं पण अवलाद गद्दार निघाली. गद्दार बोलताना बैलाला त्रास होईल असं बोलू नका बैल शेतकऱ्याचा राजा आहे, असं ते म्हणाले. मातोश्रीवर जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. What is the lineage of BJP? All ready-made hybrids: Uddhav Thackeray Jalgaon dialogue
उद्धव ठाकरे यांनी आज जळगावमधील शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना फोडण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. पण यावेळी मात्र शिवसेनेला संपविण्याचं कारस्थान रचलं गेलंय. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे.
आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असा आशावाद व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर आमदार माजी मंत्री गुलाबराव पाटलांना टोला हाणला.
भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत. भाजपवाले वंश विकत घेतायत. सध्या ज्यांना मी मोठं केलं, ते आपल्या सोबत नाहीयेत. पण त्यांना मोठे करणारे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमच्याच ताकदीवर आपण त्यांना धडा शिकवू. पण आज नि:क्षून सांगतो, आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचं झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594956505515416/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/594809638863436/
आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे मी आधीच बोललो होतो. परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं कि शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की, अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होतेय, असंही ठाकरे म्हणाले.
कालच नागपंचमी झाली. असे बोलतात की नागाला कितीही दूध पाजले तरी तो चावतोच. या सर्वांनाही निष्ठेचे दूध पाजले, पण ही औलाद गद्दार निघाली. पण यांना गद्दार बोलताना बैलाचा उल्लेख करू नका, कारण बैलाला त्रास होईल. बैल हा शेतकर्याचा राजा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फुटीरांना फटकारले. जो काही सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या, विधानसभेच्या निवडणुका घ्या, मग दाखवून देऊ, असे आव्हान त्यांनी भाजप आणि फुटिरांना दिले.
□ सत्तासंघर्ष: सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली, उद्या निर्णय येण्याची शक्यता
#सुराज्यडिजिटल #court #सत्तासंघर्ष #न्यायालय #surajyadigital #SupremeCourt
– महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली आहे. यावर उद्या (गुरुवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी पहिल्यांदा याच प्रकरणावर सुनावणी होणार, असे स्पष्ट केले. शिंदे गट बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद ठाकरे यांच्या बाजुने करण्यात आला. तर आम्ही पक्ष सोडलेला नाही व पक्षांतरबंदीचा कायदा येथे लागू होत नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.
□ शरद पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीत येणार एकत्र
– राज्यातील तीन महत्वाचे नेते शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत एकत्रीत येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन दिल्लीत 7 ऑगस्टला होणार आहे. या निमित्ताने ही नेतेमंडळी एकत्र दिसणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातून ओबीसी बांधव दिल्लीत दाखल होत असून शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594773718867028/