नवी दिल्ली : ‘हिंदूंनो, या तिरंग्यानेच तुम्हाला बरबाद केलंय’, ‘तिरंगा सोडा भगवा लावा’, गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांच्या या वादग्रस्त विधानाने सध्या वातावरण चांगलेच गरम केले आहे. It is the tiranga that has ruined you; Maharaj Barle, Listen Twitter Video Lucknow Ghaziabad Uttar Pradesh
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्राकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु करण्यात आले आहे, ज्याला देशभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अशात कट्टर धर्मवादी यति नरसिंहानंद यांनी हिंदूंना घरावर तिरंगा ऐवजी भगवा ध्वज लावण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरातील पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आणि हिंदूंना भाजपच्या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरातील पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते 'हर घर तिरंगा' मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदूंना भाजपच्या या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. pic.twitter.com/GJQ3uUKv8y
— Vaishnavi Karanjkar (@vaishnavikaran4) August 13, 2022
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये यती हे सांगत आहे की, सरकारने पश्चिम बंगालमधील सलाउद्दीन नावाच्या मुस्लिमाच्या मालकीच्या कंपनीला तिरंगा बनवण्याचे कंत्राट दिले आहे. हिंदू हे जगातील सर्वात मोठे ढोंगी असल्याचे ते व्हिडिओमध्ये म्हणत आहे. भाजपवर निशाणा साधत त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हे लोक सत्तेत आल्यावर त्यांनी मुस्लिमांना सरकारी निविदा दिल्या. तिरंगा खरेदी करण्यासाठी हिंदूंना जो पैसा द्यावा लागेल तो मुस्लिमांच्या खिशात जाईल आणि जिहादींना (इस्लामी अतिरेकी) दान केला जाईल.
पोलिस अधीक्षक (ग्रामीण) इराज राजा यांनी सांगितले की, पोलिस यतीच्या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्याच्या कलमांखाली कारवाई केली जाईल.
दरम्यान, तीन महिन्याखाली यांनी संन्याशाची घोषणा केली. महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरि यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. ‘आता पुढचे जीवन केवळ धार्मिक कार्यासाठी व्यतीत करणार’, असेही त्यांनी म्हटले होते. जिहादच्या विरोधातील लढाई आणि धर्म संसदेचे आयोजन यांच्यापासून स्वतःला वेगळे केल्याचेही त्यांनी या वेळी घोषित केले होते.