नागपूर : बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज नागपुरात त्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी भाजपमधील वरिष्ठ नेत्याने बावनकुळे यांनी बायको पळवून आल्याचे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला. वाचा पुढे कोणत्या नेत्याने म्हटले आहे. Chandrasekhar Bawankule abducted his wife; Statement of senior BJP leader Nitin Gadkari Fadnavis
हे वक्तव्य केंद्रीय मंत्री, भाजपमधील वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलंय. बावनकुळे यांचे एक सिक्रेट नितीन गडकरी यांनी सर्वांना सांगून टाकले. “बावनकुळे यांच्या करियरची सुरवात रिक्षाचालक म्हणून झाली. त्यांची बायको त्यांनी पळवून आणली आहे. हे ते कोणाला सांगत नाहीत. कशी आणली हे ते सांगतील. ते तेली आहेत तर त्यांची बायको कुणबी आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा तरुण कार्यकर्त्यांना होईल. वयस्करांनी या भानगडीत पडू नये”, असेही नितीन गडकरी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये एवढे कर्तुत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. कोणती फाईल कशी फिरवतील. काही सांगता येत नाही. पण, लोकांचे प्रश्न ते मार्गी लावतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदाची धुरा नुकतीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती सोपवण्यात आली. त्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठ कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे संघर्ष आणि कुठलेही मिळालेले काम पूर्ण करण्याची चिकाटी बघून त्यांना पक्षाने वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. दिलेल्या संधीचे सोनेही त्यांनी केले. बावनकुळेंच्या कार्यशैलीने तर विरोधकही भुरळ घातली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रस्ताव तर कोणताही नेता सादर करतो, मात्र ते बजेटमध्ये कसे आणता येईल याचा अभ्यास बावनकुळेंना आहे. विरोधातील आमदार अर्थमंत्र्यांकडे कायम तक्रार करायचे की आमच्यापेक्षा जास्त निधी बावनकुळेंना कसं, त्यावेळी अर्थमंत्री म्हणायचे की त्यांच्याकडून मागोवा घेणे शिका, आणि प्रस्ताव सादर केल्यावर बजेटमध्ये उमटविण्यासाठी त्यांचे परीश्रम बघा, या आठवणी फडणवीसांनी आवर्जून सांगितल्या.
सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले , माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने खूप काही दिले आहे. त्यामुळे माझे अस्तित्व हे पक्षामुळेच आहे. पक्षाने राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ही खूप मोठी बाब आहे. पक्षविस्ताराच्या या संधीचा नक्कीच उपयोग करुन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा विकास घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची, ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
□ देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सूचक वक्तव्य
राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसच व्हावे, पण जर ते केंद्रात गेले तर राज्यात बावनकुळे हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात. तसं मी म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले नेते पुढे काय होतात, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.