सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा न्हाऊन निघाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी महिला अधिकारी – कर्मचाऱ्यांची हर घर तिरंगा संदेश रॅली काढण्यात आली होती. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. CEO Swamy felicitated the Nodal Officer for hoisting the flag; Jan in the rally brought the CEO playing Lazim
आज रविवारी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये सर्वच अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. हरीभाई प्रशाला, सरस्वती विद्यामंदिर यांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली रॅली डफलीन चौक, हरीभाई देवकरण प्रशाले समोरून जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विसर्जित झाली.
रॅलीच्या दर्शनी भागात हरिभाई देवकरण प्रशालेच्या एनसीसीचे विद्यार्थी त्या पाठोपाठ सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थी त्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचा रॅलीत सहभाग होता. शंभर मीटर तिरंगा झेंडा हा रॅलीचा आकर्षण ठरला.
छत्रपती शिवाजी उद्यानात आल्यानंतर याााठिकाणी हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरमचा गगगनभेदी जयघोष करण्यात आला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या रॅलीला उस्फूर्त सहभाग मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानताना दुसऱ्या दिवशीही हर घर तिरंगा उपक्रमाचे नोडल अधिकारी इशादीन शेळकंदे यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला.
शेळकंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्यास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली..
यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांनी लेझीमचा जोशपूर्ण खेळ सादर केला.
या रॅलीत मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, उपशिक्षणाधिकारी जावीर, उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अनिल जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, शिक्षक संघटनेचे शिवानंद भरले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 निमित्त श्रावणमासाचे : हर्रर्र बोला.. हर्रर्रच्या गजरात निघाली 68 लिंग पदयात्रा
□ 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हीजनचा उपक्रम
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांचे एकदा हर्र बोला.. हर्र… श्री सिध्देश्वर महाराज की जय, या जयघोषात अभिषेक करुन भाविकांनी रविवारी ६८ लिंगांचे दर्शन घेतले.
प्रातःकाळी मंगलमय वातावरणात जेष्ठ समाजसेवक बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव व्हिजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले, 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, संजय साखरे, राजेश नीला, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, नागनाथ चांगले, अरुण पाटील, आशा शेटे, रेखा बंडगर, सोनाबाई लांडगे, श्रुती माळगे, भाग्यश्री भास्कर, सपना गायकवाड आदी सहभागी झाले होते.
श्रावणातील तिसऱ्या रविवारी निघालेल्या या पदयात्रेत महेश माळगे स्वामी यांनी प्रत्येक लिंगाची पूजन व अभिषेक केले. या पदयात्रेत शहर परिसरातील भाविकांसोबतच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथील सुमारे 250 भाविकांचा समावेश होता. विशेष करुन या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग उल्लेखनीय होता.
पदयात्रेच्या मध्यंतरात शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्या वतीने सहभागी भाविकांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. पदयात्रेच्या यशस्वितेसाठी बसवराज बेऊर, आनंद नसली, उज्वल सावळगी, अशोक ग्वालगेरी, संगप्पा मेणसे, प्रशांत जाधव, विनायक कलशेट्टी, धानेश सावळगी, सचिन विभुते यांनी परिश्रम घेतले.