मुंबई : शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं आज रविवारी (ता.14) निधन झालं. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. Accidental death of Shiv Sangram Party’s Vinayak Mete Death of stock market king Rakesh Jhunjhunwala
झुनझुनवाला यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली आहे.
राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज होते. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख होती. कारण, बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती आणि त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असं म्हटलं जातं. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए होते.
राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली, असं सांगितलं जातं. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती आज 6 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 45,328 कोटी रुपयांची आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची सर्वाधिक किंमत असलेली गुंतवणूक ही घड्याळं आणि दागिने तयार करणारी कंपनी टाटा समुहाच्या टायटन कंपनीमध्ये आहे.
झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिज कॅण्डी रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला. मात्र पुन्हा आज सकाळी ६ वाजता प्रकृती खालवल्याने ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
डॉक्टारांनी यावेळी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.
झुनझुनवाला हे शेअर मार्केटमधील अनेक मात्तबर व्यक्तिमत्वांपैकी एक होते. अनेकांनी त्यांच्या टिप्स फ़ॉलो करून शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले. काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी सुरु केली होती. प्रवाशांना कमी दरात सुविधा दिल्यामुळे त्यांची विमान सेवा चर्चेत आली होती. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देखील मिळाले आहे.
महाराष्ट्रात शिवसंग्राम नेते विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
□ विनायक मेटे यांचा जागेवरच मृत्यु झाला – डॉक्टर
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात झाला. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. आज रविवारी (ता.14) पहाटे पाच वाजता त्यांचा अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.
अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.