मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. त्याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके ! रोख घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो ! सुधीरभाऊंना चांगलं खातं न दिलेल्या सरकारचा धिक्कार असो ! अशा घोषणा विरोधकांनी केल्या. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षातील नेत्यांनी सरकारचा निषेध केला. 50 boxes is perfectly OK; Opposition strongly attacked the government Monsoon Session Declaration Legislature
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. फडणवीस आणि शिंदे सरकारमध्ये सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार यांच्या विरोधात आणि खुद्द सरकार विरोधात झालेल्या घोषणाबाजीने सरकारला पळता भुई थोडी झाली! याचे मुख्य सूत्रधार होते धनंजय मुंडे. विधिमंडळातील आंदोलन त्यांनी गाजवले. शेतकऱ्याला मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!,आशिष शेलार यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!, आशिष शेलार यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!, संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!, सुधीर भाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! ईडी सरकार हायहाय ! अशा घोषणा दिल्या.
ज्यावेळी बंडखोर आमदार आले त्यावेळी मोठ्याने घोषणाबाजी झाली. यावेळी त्यांना डिवचणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. “आले रे आले, गद्दार आले”, “50 खोके एकदम ओक्के!” अशा घोषणा देऊन बंडखोरांना त्रास देण्याचा आणि मार्मिक चिमटे काढण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्यात धनंजय मुंडे यांच्यावर सर्वांचे लक्ष होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांनी आमच्यामागे महाशक्ती असल्याचं सांगितलं आहे. राज्यपालांवर आम्ही जो संशय व्यक्त केली होता तो खरा ठरला आहे. आम्ही निवडणूक मागत असताना न्यायव्यवस्थेत असल्याने कारवाई करता येणार नाही सांगत होते. राज्यपालांनी निवडणूक लावली आहे त्यावरुन कोणती महाशक्ती आहे हे समजत आहे. हुकूशमाही आणि दडपशाही सुरु असून त्याचा वापर विधानसभेत होऊ नये, अशी आग्रही विनंती आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला जाऊ शकतो, असं आमचं म्हणणं आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी करत शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. व्हीपवरून प्रश्न केला असता त्यांनी शिवसेनेचा व्हीप अधिकृत आहे असल्याचा दावा केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका असेही आवाहन त्यांनी आरे कारशेडचा उल्लेख करत एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना टोला लगावला.