□ भाजपची नवी निवडणूक समिती जाहीर, फडणवीसांचा समावेश
मुंबई : भारतीय जनता पक्षाबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक निर्णय घेताना भाजपाने पक्षाकडून नितीन गडकरी यांना मोठा धक्का दिला आहे. Big blow to Nitin Gadkari from BJP, Devendra Fadnavis preferred politics
भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील मुख्य भाजपच्या नेत्यांची नाव आहे.
जेपी नड्डा हे संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. भाजपने ज्या तीन नव्या चेहऱ्यांचा संसदीय समितीत समावेश केला आहे. त्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा. के. लक्ष्मण आणि सर्वानंद सोनोवाल यांचा समावेश करण्यात आला आहे.
या यादीत देवेंद्र फडणवीस यांचंही नाव आले आहे. मात्र, महत्वाची बाब म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव मात्र या यादीतून वगळण्यात आले आहे. सलग दुसऱ्या यादीतून गडकरींचे नाव वगळण्यात आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
भाजपने नवी निवडणूक समिती जाहीर केली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय या समितीत जेपी नड्डा (अध्यक्ष), बीएल संतोष (सचिव), वनाथी श्रीनिवास, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव व ओम माथूर या नेत्यांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजपच्या संसदीय बोर्डाच्या समितीमध्ये आता एकही मराठी माणूस नाही. भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठी पद दिली जात नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे.
राज्यांमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणात कुणाशी युती करायची, याचा निर्णय ही समिती घेते. तसंच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये आणि विधान परिषदांमध्ये पक्षाचा नेता निवडीचं काम ही समिती करते. निवडणूक समितीचं काम निवडणूक समितीला भाजपमध्ये संसदीय समितीनंतरचं दुसरं महत्त्वाचं स्थान आहे. ही समिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तिकीट वाटपाचे निर्णय घेतात. तसंच प्रत्यक्ष निवडणुकीत कुणाला उतरवायचं आणि पक्ष संघटनेचं काम कुणाला द्यायचं, हे निर्णय निवडणूक समिती घेते.
□ समितीत यांची नावे
बोर्डाचे सदस्य म्हणून जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियूरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, बीएल संतोष (सचिव) अशी नावे आहेत.
याशिवाय भाजपने निवडणूक प्रचार समितीचीही घोषणा केली आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि ओम माथूर यांना स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यात स्थान देण्यात आलं नाही.
निवडणूक प्रचार समितीत जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडीयूरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, बीएल संतोष (सचिव), व्ही. श्रीनिवास अशी नावे आहेत.