मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादीचा बडा नेता तरूंगात जाणार असल्याचा सूचक इशारा ट्वीट करून दिला आहे. आता त्यानंतर हर हर महादेव अब तांडव होगा ! या अर्थाचे हे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच कंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. Har Har Mahadev ab tandav hoga! Mohit Kamboj will be the leader of NCP in jail
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या त्या नेत्याबाबत ट्विट केले आहे. जवळपास पाच ट्विट आतापर्यंत मोहित कंबोज यांनी केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा हा नेता कोण, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कंबोज यांनी “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे आज नक्की कोणत्या नेत्यावरती कारवाई होणार आहे की आणखी कोणत्या बड्या नेताचा घोटाळा ते उघड करणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांड्ये, संजय राऊत अशी चार नावांची यादी शेअर करत पाचव्या जागा रिकामी ठेवली आहे. आणि त्याच्या खाली आमचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. असे म्हटलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मोहित कंबोज यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं आहे. “भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी,” या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
मोहित कंबोज यांनी काल मंगळवारी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये “2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे,” असा उल्लेख आहे.
□ अजित पवारांविषयी चर्चा
सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नाव आलं होतं. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचं स्पष्ट केलं होता. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, “या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक 7 (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही, असे म्हटले होते.
□ राष्ट्रवादीचा पलटवार
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या अधिवेशानापूर्वी अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर टीका केली. “मोहीत कंबोज हा ब्रम्हज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का? याल कसे कळते ईडी आणि सीबीआय कुठे चौकशी करणार आहे? त्याच्यामुळे याचीच चौकशी झाली पाहिजे की, हा ईडीच्या कार्यालयात पूर्ण वेळ बसणारा कार्यकर्ता आहे का? मोहीत कंबोज हा फक्त भाजपाचा भोंगा आहे. त्याला दुसरे काही जमत नसून, तो फक्त एक आभास निर्माण करतोय. तसेच, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकडवण्यासाठीचा हा त्याचा प्रयत्न आहे”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजपावर हल्लाबोल केला जात आहे.