औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाचा सैन्य भरती दरम्यान मृत्यू झाला आहे. याचे नाव करण पवार असून हा तरुण कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावचा होता. याचे वय 20 वर्षे होते. सैन्य दलात भरतीसाठी तो अनेक दिवसांपासून सरावही करत होता. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. Agnivir Bharti: Youth dies during army recruitment Aurangabad
भरतीच्या वेळी रनिंग करताना त्याला चक्कर आली. नंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे पुन्हा भरतीच्या वेळी तरुणांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवला आहे.
सैन्याच्या वतीने सुरू असलेल्या अग्नीवीर भरती चाचणी दरम्यान धावतांना कन्नड तालुक्यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धावण्याच्या चाचणीत पाच फुटाचे अंतर शिल्लक असतांना हा तरुण अचानक खाली कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
विठ्ठलवाडी येथील दोन सख्खे भाऊ अग्नीवीर भरतीसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मैदानावर सुरु असलेल्या भरती चाचणीसाठी आले होते. काल बुधवारी (ता. 17) रात्री साडेबाराच्या दरम्यान धावण्याची चाचणी देत असतांना करण नामदेव पवार (वय- २०, रा. विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) या तरुणाचा मृत्यू झाला. करण आणि सागर हे दोघे सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी काल बुधवारी संध्याकाळी विद्यापीठात दाखल झाले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रात्री मैदानी चाचणी घेण्यात आली तेव्हा करणने तीन राऊंड पुर्ण केले होते, चौथ्या आणि शेवटच्या फेरीचे अवघे पाच फुट अंतर शिल्लक असतांना करण अचानक कोसळला. रात्री उशीरा त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून करण मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
□ मृत्यू नेमका कशामुळे झाला ?
हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. करणच्या मृत्यूचा त्याच्या वडिलांना व भावाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, करणसोबत भरतीसाठी आलेला त्याचा लहान भाऊ सागर म्हणाला, आम्ही घरून आणलेली भाकरी खाल्ली. दोघे मिळून देशसेवा करण्याचे स्वप्न आम्ही पाहत होतो. करणने मैदानाच्या तीन फेऱ्या पुर्ण केल्या होत्या शेवटच्या फेरीत काही फुटांचे अंतर शिल्लक असतांनाच तो खाली कोसळला.
□ दुदैवी..! भावी ‘अग्नीवीर’ सैनिक फुटपाथवर झोपले
राज्यात अग्निवीर भरती प्रक्रिया पार पडत आहे. औरंगाबाद शहरात या भरतीसाठी आलेले तरूण रात्री रस्त्यांच्या फुटपाथवर झोपलेले दिसून आले आहेत. त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची कोणतीच सोय नाही. या तरूणांचे अतोनात हाल होत आहे. या स्थितीत त्यांना रात्री 1 च्या सुमारास भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. दुकानदार 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रूपयांना विकली जात आहे.