मुंबई : ओमान मधून आलेली शस्त्रास्त्र असलेली संशयास्पद बोट रायगडमध्ये जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. आता यामागे काही घातपाताचा कट होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. या घटनेनंतर पोलिसांनी राज्यभरात हाय अलर्ट जारी केला आहे. Boat with weapons found, high alert across Maharashtra Oman Aditi Tatkare
समुद्रकिनाऱ्याभोवतीच्या परिसरात पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहे. ओमान मधून आलेली शस्त्रास्त्र असलेली संशयास्पद बोट रायगडमध्ये जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात 26/11 सारखा हल्ला करण्याचा कट होता का ? अशी भीती व्यक्त होत आहे. या बोटीवरील लोकांनी हरिहरेश्वर किनाऱ्यावर आल्याची माहिती तटरक्षक दलालाही दिली नाही. सागरी भागात दहशतवादी येण्याची शक्यता नेहमीच असते. यापूर्वी 26 नोव्हेंबर 2008 रोजीचा हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात आले होते.
शस्त्रास्त्र असलेली संशयास्पद बोट रायगडमध्ये जप्त करण्यात आली आहे. याबाबत श्रीवर्धनच्या (रायगड) आमदार आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘प्राथमिक माहितीनुसार, रायगडमधील श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर आणि भरडखोलमध्ये शस्त्रे आणि कागदपत्रे असलेली बोट सापडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
स्थानिक पोलिस तपास करत आहेत, मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने एटीएस किंवा राज्य एजन्सीची स्पेशल टीम नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडच्या आमदार आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली.
रायगडच्या हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट आढळली आहे. यामध्ये 3 एके 47 बंदूका व काडतुसे सापडली आहेत. तसेच याव्यतिरिक्त काही संशयास्पद माहिती आढळल्याची माहिती आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी पुण्यामध्ये जर्मन बेकरीत बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली आहे. राज्य शासनाने सर्व राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.
या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. नेपच्यून मेरीटाईम सिक्युरिटी असे एका बॉक्सवर स्टीकर आढळून आल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. ही बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बोटीची पाहणी केली जात आहे. ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.