सोलापूर : सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कैलास आढे, पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी आश्रमशाळांना बेकादेशीरपणे अनुदान वाटप प्रकरणी चौकशी करण्यासाठी उपायुक्त भगवान वीर यांची नियुक्ती केली आहे. Solapur Assistant Commissioner of Social Welfare will be investigated and protested
कैलास आढे हे किसन पाटील या शिपायामार्फत कोट्यावधीतचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांनी केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आले होते.
या प्रकरणाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मारहाणीतील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – पिंपळगाव (जि.लातूर) येथे मारहाणीत जखमी झालेली शहेनाज शौकत तांबोळी (वय ३५) ही महिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज गुरुवारी दुपारी मरण पावली.
७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पिंपळगाव येथे भावकीतील शेताच्या वादातून हाणामारी झाली होती. त्यात शहेनाज आणि त्यांचे पती शौकत तांबोळी असे दोघेजण जखमी झाले. होते त्यापैकी शहेनाज तांबोळी यांना लातूर येथे प्राथमिक उपचार करून ९ ऑगस्ट रोजी शफिक शेख (भाऊ) यांनी त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या आज मयत झाल्या. अशी नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली. या संदर्भात मुरुड पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.
□ सारोळे येथे विष पिऊन आत्महत्या
सारोळे (ता.बार्शी) येथे दारूच्या नशेत विष प्राशन केलेला कुमार धर्मा कुऱ्हाळे (वय ५९) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज गुरुवारी (ता. 18) दुपारी मयत झाला. ११ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्याने नशेत विष प्राशन केले होते. त्याला बार्शी येथे प्राथमिक उपचार करून विठ्ठल दळवी (जावई) यांनी सोलापुरात दाखल केले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.