ठाणे : शिवसेनेतून बंडाळी करत शिंदे गट वेगळा झाला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचे सांगितले होते. आता दहीहंडीच्या उत्सवदिनी शिंदे गटाकडून ठाण्यातील टेंभी नाक्यावर बाळासाहेबांचे एका भाषणातील एक वाक्य असलेला एक पोस्टर लावण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये ‘मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, ‘ या अर्थाचा हा मजकूर आहे. ‘Shiv Sena will not allow Congress’; Dahihandi Eknath Shinde poster appeared on Tembhi Naka
टेंभी नाक्यावर पोस्टर्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दहीहंडीच्या ठिकाणी हा भाजपाचा कार्यक्रम असल्याचे भासत आहे, अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत. टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी होत असली तरी याठिकाणी भाजपाच्या नेत्यांचे भले मोठे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळाली.
टेंभी नाक्यावरील हा उत्सव आनंद दिघे यांनी सुरू केला होता, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती लावली. अभिनेत्री श्रद्धा कपूरचीही विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, दहीहंडीला आता साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. पुढील वर्षीपासून प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ठाण्याची मनाची हंडी समजल्या जाणाऱ्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर झळकवण्यात आले आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी सोबत जाणार का?,असा प्रश्न ठाकरे गटाला या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातील दही हंडी उत्सवात उत्सवाबरोबर बॅनर बाजीतून राजकीय टोलेबाजीदेखील करण्यात येत आहे.
दहीहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या आहेत. आनंद दिघेंनी सुरु केलेल्या ठाण्यातील दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी शिंदेंनी चांगलीच टोलेबाजी केली. गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली. हे सर्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे. तसेच यापुढे हे थर वाढत जाणार, असे शिंदे म्हणाले. सत्तांतरावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही 50 थर लावले, आपण जाऊया लवकरच गुवाहाटीला जाऊया असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरखळी दिली आहे.
अपेक्षेप्रमाणे या उत्सवात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे यांनी टोला लागावण्यात आला आहे. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांची निष्ठतेची दहीहंडी असा प्रचार करण्यात आला असल्याने समोरासमोर असलेल्या या दोन्ही उत्सवात उत्सव आणि राजकीय संघर्षदेखील पाहायला मिळाला.