पुणे / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला नव्याने उभं करण्यासाठी कंबर कसली आहे. आजपासून मनसेने राज्यभरात सदस्य नोंदणीला अभियानाचा बिगुल फुंकला आहे. यात मनसेने आपल्या घोषवाक्यात बदल केलाय. आता याचा मनसेला फायदा होणार की तोटा हे येणारा काळच ठरवेल. MNS changed its slogan; I am Hindvi Rakshak, I am Maharashtra Sevak Raj Thackeray
याची सुरूवात पुण्यातून केली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची वाट धरली आहे. त्यांनी अजान-हनूमान चालिसा, भोंगे इत्यादी मुद्यावरून राज्यातील वातावरण तापवले होते. त्यांच्या बदलत्या भूमिकेचे प्रतिबिंब असलेले नवं पोस्टर शेअर केले आहे. मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाची जोड दिली आहे.
आता भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान, असं नमूद केलेलं पोस्टर पुढे आले आहे. यावर राज ठाकरेंचा हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक, असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, हे मनसेचं नवं घोषवाक्य देण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांनी, मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक हे घोषवाक्य ही जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे आता मुंबईसह राज्यभरात मनसेची सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. त्याआधिच या घोषवाक्याचे रात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर पहायला मिळत आहेत. तर राज ठाकरे गणेश उत्सवानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत अशीही माहिती मिळत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. नेहमी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर आक्रमकपणे लढणारी राज ठाकरेंची मनसे आता मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक या नव्या घोषवाक्य देणार आहे.
2014 मध्ये मनसेचा राजकीय प्रवासासह स्पर्धा पाहता मागे पडला आहे. यानंतर आता मनसेने मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत राजकारणात पुन्हा आक्रमक पद्धतीने सक्रिय झाली, यात हिंदुत्वाचा मुद्दाही मनसेने आता लावून धरला आहे. यात आता नव्या घोषवाक्यातून मनसेने मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड दिली आहे. त्यामुळे मनसेची पुढील राजकीय भूमिका यातून स्पष्ट झाली आहे. या मुद्द्यावरून मनसे आता पुन्हा राजकारण आक्रमकपणे सक्रिय होण्यास सज्ज झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेत आता बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. नुकतचं मुंबईत सलग दोन दिवस त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळाव्यांना हजेरी लावली. यात आता राज ठाकरे पुण्यात जाणार आहे. पुण्यातून ते मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा नारळ फोडत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यभरात मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेने ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ हे नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. यापूर्वी मनसेने पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरेंनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य जाहीर केलं होतं. आता यात बदल केलाय.