सोलापूर – ‘सही रे सही’ या मराठी रंगमंचावरील नाटकाला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयीच्या आठवणी नाट्य कलावंत, सिनेअभिनेते भरत जाधव यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात जागवल्या. यावेळेस केक कापून कौतुक केले. cut the cake to celebrate 20 years of ‘Sahi Re Sahi’ with the blessings of the adoring audience
सही रे सहीने आतापर्यंत 4207 प्रयोग झाले आहेत, 4208 वा प्रयोग उद्या शुक्रवारी (26 ऑगस्ट ) सोलापुरात सादर होत आहे. सलग 20 वर्ष एकच नाटक सादर होणे, हे विक्रम आहे. रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळेच हा प्रयोग यशस्वी आणि विक्रमी होत असल्याचे भरत जाधव यांनी सांगितले.
सही रे सही नाटक प्रयोगाच्या निमित्ताने भरत जाधव हे सोलापुरात आले असताना, आज गुरुवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी जयराज नायर, जयप्रकाश जातेगावकर, नंदकुमार आहुजा, प्रशांत बडवे, गुरु वठारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते.
प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने भरत जाधव यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सही रे सही या नाट्य प्रयोग सादरीकरणाला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाट्य अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
15 ऑगस्ट 2002 साली शिवाजी मंदिर मुंबई येथे पहिल्याच दिवशी दोन प्रयोग सादर झाले होते. तेव्हापासून हा प्रयोग राज्यातील विविध शहरात सुरूच आहे. आता 21 व्या वर्षातील पहिला प्रयोग सोलापुरात होत आहे, याचा आनंद होत असल्याचे म्हटले.
महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे हा प्रयोग करणे शक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले असले, तरी याचा नाटकावर परिणाम झालेला नाही. नाटकात जिवंतपणा असल्यामुळे आतापर्यंत असा विक्रमी प्रयोग सादर होणे हे यशाचे गमक असल्याचेही जाधव म्हणाले.
भरत जाधव पुढे म्हणाले की, काम करत गेलो, प्रयोगाची संख्या वाढत गेले. विक्रम ठरवून होत नाही, केदार शिंदे सारख्या निर्मात्याने हातात चाबूक घेऊन शिकविल्याने प्रयोगात उत्साह कायम राहिला आहे. या प्रयोगाला महाराष्ट्रातील लोकांनी उचलून धरले, लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाने हा प्रयोग पाहत आलेला आहे, हे नाटक फॅमिली नाटक बनले आहे. रसिक प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या आणि प्रोत्साहन हे काम करण्यास ऊर्जा मिळते. लोक म्हणतील तेव्हा थांबणार आहे, असे ते म्हणाले.
□ 234 वेळा प्रयोग पाहणारे प्रेक्षक
आतापर्यंत सही रे सही या नाटकाचे 4207 प्रयोग सादर झाले असून, पुण्यामध्ये एक प्रेक्षक 234 वेळा हा प्रयोग पाहिल्याचे सांगितले आहेत. अनेक वेळा हा प्रयोग पाहूनही प्रत्येक वेळी हा प्रयोग पाहावा असे सादरीकरण व प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाले. नाटक हा नाटक राहिला नसून, हा एक सण झाला आहे. हे लोकांनीच लोकांना सांगत आहेत, की नाटक पाहावे म्हणून. याचे अमेरिकेतही प्रयोग सादर झाले आहेत. सोलापुरात 200 प्रयोग सादर झाला होता. आता 4208 वा प्रयोग सादर होत आहे असे भरत जाधव म्हणाले.
यावेळी सही रे सही या नाट्य प्रयोग सादरीकरणाला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाट्य अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते केक कापण्यात आला.