□ बोटे थरथरली, पण परिवर्तनाचे पडलेले पाऊल पक्क होते
□ जुनाट व अनिष्ट प्रथा बाळगणांऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन
• सोलापूर / शिवाजी भोसले
एका चक्क विधवा महिलेने सौभाग्याचे लेणे अर्थात कुंकू राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळेंच्या भाळी लावले. हे करताना त्या महिलेची बोटे थरथरली. अंगात कापरे भरले. पाय लटापटा कापले खरे, पण जुनाट व अनिष्ट प्रथांना झुगारून देण्याचे परिवर्तनाच्या नांदीचे पाऊल पक्क पडले. The widow built a cave of good fortune for Supriya Sule’s daughter Vasantrao Nagde Osmanabad
फुले, आंबेडकर अन् शाहू यांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात एका विधवा रणरागिणीचा सन्मान झाला. या सन्मानाला खरे चार चाँद लागले ते, आधुनिक विचाराची कास धरण्यासह, युवती आणि महिलांच्या परिवर्तन चळवळीचा झेंडा अटकेपार लावणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे.
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या भन्नाट किरस्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावरून सध्या अक्षरश: तुफान व्हायरल होतोय. ज्यांच्या बाबतीत हा किस्सा घडला, त्या सुप्रियाताईंच्या परिवर्तनवादी विचारांचे व कृतीचे मूळच्या भारतीय पण जगभरात वास्तव्यास असलेल्या आधुनिक विचारांच्या रणरागिणींकडून कौतुक होऊ लागले आहे.
हा प्रसंग घडला शुक्रवारी संसदरत्न आणि राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे सोलापूरचा दौरा उरकून उस्मानाबाद दौऱ्यावर गेल्या. तिथे नागदे परिवारात हा क्षण पहायला मिळाला घडला आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात घेतला गेला. त्यातून सुप्रियाताईंच्या पुरोगामीपणाची प्रचिती आली. त्याचाच व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांच्या निवासस्थानी सुप्रियाताई गेल्या. सुप्रियाताई येणार म्हटल्यानंतर अगोदर तिथे मोठी गर्दी झाली होती. याच मोठ्या गर्दीच्या माहोलात वसंतराव नागदे यांच्या विधवा सुनाबाईंनी औक्षण करत सुप्रियाताईंचे मनोभावे स्वागत केले. सुप्रियाताईंच्या कपाळी सौभाग्याचे लेणे लावताना या सुनबाईंचा हात धरधरत कापत होता. अंगात कापरे भरले होते. पाय लटापटा कापत होते. तथापि, अशा अवस्थेत आपल्या सुनबाईला मोठा आधार देत वसंतराव नागदे यांनी सुप्रियांच्या कपाळी कुंकू लावून औक्षण पार पाडले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एरव्ही आपल्याकडे विधवा महिलांना मंगल कार्यावेळी जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते. पांढऱ्या कपाळाच्या महिलांनी मंगल कार्यात सहभागी होणे म्हणजे अपशकून मानले जाते.
पण सुप्रियाताईंच्या दौऱ्यात नागदे परिवारात पडले ते सर्वांना आश्चर्य वाटणारे. सुप्रिया सुळे यांनी विधवेकडून औक्षण करून घेऊन आणि वसंतराव नागदे यांनी औक्षण करण्यास भाग पाडून विधवेबद्दलच्या जुनाट व अनिष्ट प्रथेला जणू मूठमाती दिली.
या प्रसंगाने आधुनिक विचारांच्या महाराष्ट्रात विधवेलादेखील औक्षण करता येईल. कपाळी सौभाग्याचे लेणे लावता येईल, असा आधुनिकतेचा पायंडा पडला. जुनाट व खुळचट तसेच अनिष्ट रूढींचा पगडा असलेल्यांच्या डोळ्यात या घटनेने जळजळीत अंजन घातले गेले. हा एकूणच प्रकार अंगावर रोमांच उभा करणारा होता.
》सुप्रियाताई म्हणाल्या…. तो प्रसंग नवी दिशा देणारा अन् आश्वासक
सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचे दुःख खूप मोठे आहे. पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तो भरभरून जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबीयांनी ठामपणाने उभे राहिले पाहिजे.
वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली, तेंव्हा वसंतरावांचा हा एक वेगळाच पैलू पहायला मिळाला. त्यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांनी सुनेच्या हातून आम्हा सर्वांचे स्वागत केले. स्वागताचे कुंकू लावताना सुनबाईंचा हात थरथरला पण वसंतरावांनी तिला धीर दिला. हा सगळा प्रसंग अतिशय भावुक करणारा, नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता.