सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार विजय देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. come Death threat to Vijay Deshmukh; The Commissioner of Police ordered an inquiry in Solapur
गेल्याच महिन्यात राज्यभर तसेच देशभरात पीएफआय या देशविघातक संघटनेच्या ठिकठिकाणीच्या कार्यालयावर तसेच कार्यकर्ते राहत असलेल्या घरावर छापे मारून अनेकांची धरपकड केली. सोलापुरात सुद्धा पीएफआयच्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांची धरपकड करून त्याला अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपचे आमदार विजय देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली.
तसेच त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या हस्तलिखिता मध्ये १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र आ.विजय देशमुख यांना पाठवलेले आहे.
या पत्रामध्ये पीएफआयच्या पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्याकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या पत्राची पोलीस आयुक्त यांनी गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
“काल गुरुवारी हे पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने पत्रात दिलेल्या नावाची शहनिशा करण्याकरिता चौकशी सुरू आहे. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय निश्चित अनुमान काढता येणार नाही”
सुनील दोरगे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सिद्धेश्वर एक्सप्रेसला पहाटे आग; मात्र टीसी, आरपीएफ जवानामुळे टळला अनर्थ
सोलापूर : सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीच्या चाकांमधील घर्षणामुळे आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजून 40 मिनिटाला खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानक दरम्यान घडली. मात्र गाडीतील कर्तव्यावर असलेल्या टीसी व आरपीएफ जवानच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 12116 सिद्धेश्वर एक्सप्रेस आज शुक्रवारी (दि. 7) सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या गाडीच्या चाकामध्ये प्रचंड घर्षण होऊन आग निर्माण झाली. ही घटना खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या गाडी मधील S2 व S3 कोच मध्ये घडली. दोन डब्यांना जोडल्या गेलेल्या गॅप मधून अचानक धुराचे लोट डब्यामध्ये पसरला.
ही आग पाहून गाडीला आग लागली म्हणून प्रवाशांमध्ये एकच धावपळ केली. गाडीमध्ये आग लागल्याची माहिती आरपीएफ जवान व टीसी यांना मिळताच सिद्धेश्वर एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. लागलीच S2 व S3 मधील सर्व प्रवाशांना आग आटोक्यात येईपर्यंत इतर डब्यात हलवण्यात आले. गाडीतील आरपीएफ जवान व टीसी यांनी तत्काळ अग्निरोधक यंत्राचा वापर सुरू केला.
जवळपास सात ते आठ कार्बन डाय-ऑक्साइड सिलेंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यासाठी 25 ते 30 मिनिटे गाडी कर्जत स्थानकावर थांबवण्यात आली. घटनेची माहिती पुणे विभागातील कंट्रोल रूमला मिळताच वरिष्ठ अधिकारी व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. गाडीची पाहणी करून गााडी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
》 लाईटचे काम करताना शॉक लागून एकाचा मृत्यू
सोलापूर : घरामध्ये लाईटचे काम करत असताना अंगावर चालू वायर राजशेखर सायबण्णा आलीबादी (वय-५०,रा.कुमठा) यांच्या अंगावर पडल्याने त्यांना शॉक लागून ते बेशुद्ध अवस्थेत खाली पडले.त्यावेळी नागराज आलिबादी यांनी उपचाराकरिता दाखल केले असता,त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.हि घटना दि. ७ ऑक्टोंबर रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.