सोलापूर : पत्नी बरोबर मित्राचे अनैतिक संबंध असल्याचा सुगावा लागताच जगण्याकरिता तामिळनाडू वरून सोलापूरात आलेल्या मित्रांनीच मित्राचा भोसकून खून करून काटा काढला. एमआयडीसी भागातील सुनील नगरात ही घटना रविवारी (ता. 16) रात्री अकरा वाजता सुमारास घडली. Solapur. Sunil Nagar murder of friend on suspicion of immoral relationship
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या भावाला त्याच्या भावाने उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झाला. दरम्यान या घटनेतील सर्व मारेकरी पसार झाले असून, त्यातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी राजेशकन्नन काटाराजा देवर (वय-३४,रा. कोंड्याळ शाळेजवळ, सुनिल नगर) हा तीन – चार वर्षांपूर्वी आपली पत्नी, अविवाहित लहान भाऊ मयत कल्याणी काटाराजा देवर (वय-३१,रा.सुनिल नगर, मुळगाव, अरियापट्टी, चेलमपट्टी, मदुराई, तामिळनाडू ) यांच्यासह राहत होता.
हे कुटुंब तामिळनाडूतून सोलापुरात उदरनिर्वाहासाठी आले होते. या ठिकाणी ते सर्वजण सुनिल नगरातील कोंड्याळ शाळेजवळ महेश पटेल यांच्या घरात भाड्याने राहत होते. ते सर्वजण पापड तळुन विकण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्याबरोबरच त्यांच्या गावावरून बरेचजण त्या ठिकाणी राहून पापड तळून विकण्याचा व्यवसाय करत होते.
पण तीन-चार वर्षांपूर्वी मयत कल्याणी काटाराजा देवर यांनी संशयित आरोपी कामाची देवर यांच्याकडून पैसे घेतले होते. मयत कल्याणी हा अविवाहित असल्याने त्याचे मुख्य आरोपी कामाची देवर यांच्या घरी येणे जाणे असल्याने कल्याणी याचे आपल्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध आहे, असा संशय निर्माण झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री आरोपी कामाची देवर, त्याचा भाऊ शिवा देवर व महेश देवर यांनी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मयत कल्याणी देवर यास शिवशक्ती चौका जवळ बोलावून घेतले. मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत आरोपी शिवा देवर यांनी मयताच्या दोन्ही पायावर तीक्ष्ण हत्यारानी वार केले. कामाची देवर यांनी देखील मयताच्या डोळ्यावर हत्याऱ्यांनी वार करून गंभीर जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावर सोडून सर्व आरोपी फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना फिर्यादी भाऊ यास कळतात भाऊ राजेश देवर त्या ठिकाणी पोहोचला. त्याला रात्री दहाच्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
आज सकाळी शासकीय रुग्णालयात या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मारेकऱ्यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामाची देवर, शिवा देवर, महेश देवर (सर्व.रा.सोलापूर) या तीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक वळसंगे हे करत आहेत.
□ महिनाभरातली ही दुसरी घटना
जगण्याकरिता पत्नीसह सोलापुरातील विडी घरकुल परिसरात राहावयास असलेल्या एकाचा अनैतिक संबंधातून गेल्याच महिन्यात खून झाला होता. हि घटना ताजी असताना महिन्यातून ही दुसरी घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
》 अंगावरती वीज पडून एकाचा मृत्यू
श्रीपूर : माळेवाडी जांभूड तालुका माळशिरस येथील संभाजी वासुदेव कदम (वय ५५) याचा दुपारच्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.
अधिक वृत्त असे की श्रीपुर जांबुड, नेवरे परिसरामध्ये गेली अनेक दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. माळेवाडी जांभूड तालुका माळशिरस येथील संभाजी वासुदेव कदम हे १६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास शेतामध्ये आपली जनावरे चारण्यास गेले होते.
यावेळेस अचानकपणे पाऊस आल्याने विजेचा कडकडाट सुरू झाला. शेतामधील एका झाडाच्या खाली संभाजी कदम हे आडोशाला उभे राहिले असता त्यावेळी झाडावरती वीज कोसळली. यात कदम याचा मृत्यू झाला. सदरची घटना माळेवाडी परिसरात कळताच तातडीने संभाजी कदम याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.