सोलापूर – कोरोना महामारीतील दोन वर्षांनंतर यंदा दिवाळी म्हणजे दीपोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. आनंद, उत्साह, मांगल्य आणि वैभवाचे प्रतीक असलेला हा उत्सव धामधुमीने साजरा करण्यासाठी सगळेच उत्सुक झाले आहेत. Deepotsava, Dhantrayodashi will increase gold sales up to 25% with Vasubaras Puja tomorrow? Diwali
शुक्रवार, २१ ऑक्टोबरला वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पूजनाने दिवाळीला प्रारंभ होत असल्याची माहिती ज्योतिष विशारद वेदमूर्ती डॉ. शिवयोगीशास्त्री होळीमठ यांनी दिली. १८ ऑक्टोबरला गादी मंगल (काढणे) करण्याचा दिवस असून २१ रोजी बसुबारस आहे.
यादिवशी सायंकाळी गाय वासराचे पूजन करण्याची परंपरा आहे. २२ रोजी गुरुद्वादशी असून २३ रोजी धनत्रयोदशी आहे. सकाळी ७.५० ते ९.१५ आणि दुपारी १२.७ आणि १.३३ ते २.५९ व सायंकाळी ६ ते ९.६ पर्यंत धन्वंतरी देवतेची पूजा करण्याचा मुहूर्त आहे. याच दिवशी नवीन वही आणून धनपूजन करता येईल.
२४ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी असून पहाटे अभ्यंगस्नान करून ओवाळून घेण्याची परंपरा आहे. याच दिवशी अमावस्या असून गादी स्थापना करण्याचा मुहूर्त आहे. दुपारी ३ ते ६, सायंकाळी ६ ते रात्री ८.३०, रात्री ८.३१ ते १०.८ आणि रात्री १०.३० ते रात्री १२ पर्यंत लक्ष्मी कुबेर पूजा करण्याचा मुहूर्त आहे.
२६ ऑक्टोबर रोजी पाडवा असून पहाटे १.३८ ते ३.४५, ३.४६ ते ५.५०, सकाळी ८.१ ते १०.१४, दुपारी २.११ ते ३.४९ आणि रात्री ७.९ ते ९.९ पर्यंत गादी स्थापना करण्याचा मुहूर्त आहे. तसेच मंगळवारच्या उत्तररात्री म्हणजे उजाडता बुधवारी रात्री १.३० ते ३.२१, पहाटे ३.३० ते सकाळी ६, सकाळी ६.२४ ते ९.२०, सकाळी १०.४८ ते दुपारी १२.१६, दुपारी ३.१२ ते रात्री १०.३२ पर्यंत वही पूजन करता यईल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
२९ ऑक्टोबर रोजी कडपंचमी असून सकाळी ९.१५ ते १०.३०, दुपारी १२.१७ ते १.४५, ४.४१, सायंकाळी ५.५५ ते रात्री ७.२७ आणि ८.५९ ते १०.३१ पर्यंत पूजा करण्याचा मुहूर्त असल्याचे डॉ. होळीमठ यांनी सांगितले.
□ उद्या शुक्रवारपासून शाळांना सुट्टी
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २१ तारखेपासून सुट्ट्या लागणार आहेत. तर ८ नोव्हेंबरला शाळा सुरु होणार आहेत. तर गुरुवारी प्राथमिक व माध्यमिक शाळांची सत्र परीक्षा संपणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिवाळी सुट्टी असेल. जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक शाळांना २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे.
□ धनत्रयोदशीला सोन्याच्या विक्रीत 25% पर्यंत वाढ होणार?
धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील सराफा बाजारात विक्री वाढण्याची शक्यता आहे. यंदा सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली राहण्याची अपेक्षा आहे. सणांवर खर्च करण्याबाबत लोकांचा धारणा वाढली आहे. याचा परिणाम सोने, दागिन्यांच्या खरेदीवरही होणार आहे. यंदा धनत्रयोदशीला सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी जास्त होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याचे भाव खाली आले आहेत.
■ फटाके फोडल्यास होणार सहा महिन्यांची जेल
दिवाळीनिमित्त आपण प्रत्येकजण फटाके फोडत असतो. पण जर तुम्ही फटाके फोडले तर तुम्हाला सहा महिन्यांची जेल होऊ शकते. ही बंदी दिल्लीत घालण्यात आली आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच दिल्ली सरकारने फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड लागेल आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.
□ दिवाळी – फटाके फोडल्यास तुरूंगवास अन् दंड
राजधानीत दिल्लीमध्ये कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला 200 रुपये दंड ठोठावला जाईल, तर त्याला 6 महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याचबरोबर जर तुम्ही फटाक्यांची साठवण केली, किंवा विक्रीत सहभागी झालात, तर 5000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.