मुंबई / लातूर : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला लातूर MIDC ने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला ? असा सवाल भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केला आहे. तसेच MIDC मध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर असताना त्यांनाच भूखंड कसा मिळाला, असंही मगे म्हणाले. Actor Ritesh – Genelia targeted by BJP; MIDC administration will be in trouble Latur
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा एक कारखाना सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे.
लातूरमधील 16 उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने रितेश आणि जेनिलियावर केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना 116 कोटीं रकमेचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला? असा प्रश्नसुद्धा आता उपस्थित होत आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला केवळ एका महिन्यात 120 कोटींचे कर्ज कसे दिले गेले.
या प्रश्नावरून आता चर्चा सुरु झाल्या आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने व्हायरल केलेल्या बातमीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार कमी कालावधीत म्हणजेच केवळ एका महिन्याच्या आत रितेश आणि जेनिलिया यांना कर्ज मिळाले. त्या बँकेने आतापर्यत किती जणांना कर्ज दिले? त्या बँकेने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना कर्ज दिले आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी वरिष्ठ पातळीकडून करण्यात यावी, असा जाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकरणी लातूर देश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरी ‘संबंधित वृत्त हे चुकीच्या माहितीच्या आधारे आहे असे म्हणत खुलासाही पाठवला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● एमआयडीसी प्रशासन येणार अडचणीत
भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर एमएमआयडीसी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरु करायचा आहे.
हा कारखाना सुरु होण्याआधीच तो वादात सापडला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या में.देश ऍग्रो प्रा.लि. कंपनीला लातूर एमआयडीसीने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला? असा सवालच मगे यांनी उपस्थित केला आहे.
एमआयडीसीमध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर आहेत. आधीपासूनच यांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच तातडीने भूखंड उपलब्ध करुन दिल्याचा गुरुनाथ मगे यांनी केला आहे. जाहीर पत्रकार परिषद घेत मगे यांनी हे आरोप केले आहेत.
एमआयडीसीमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना जी जमिन देण्यात आली ती कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आली. असा प्रश्न आता विचारण्यात येतो आहे. दरम्यान या सगळ्यावर रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख काय प्रतिक्रिया देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
□ महाराष्ट्रात बनणार कवितांचे गाव
महाराष्ट्राला साहित्यिकांचा, कवींचा मोठा वारसा आहे. अनेक नामांकित प्रतिभावंतांनी आपल्या प्रतिभेने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे कवीवर्य मंगेश पाडगावकर होय. आता त्यांचे जन्मगाव असलेले उभादांडा हे गाव कवीतांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. कोकणातील वेंगुर्ला तालुक्यात हे गाव आहे. याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली.