मुंबई : शिंदे सरकारला झटका देणारी बातमी आहे. प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गंभीर इशारा दिला आहे. आमदार रवी राणा यांनी खोक्यांचा उल्लेख करत बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत कडू यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मी पैसे घेतले असेल तर याचे पुरावे द्यावे, नाहीतर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, अशी धमकी दिली आहे. आपल्या संपर्कात 7 ते 8 आमदार असल्याचेही ते म्हणाले. 7 to 8 MLAs in my contact; Warning of Bachu Kadu; We will take a different decision Ravi Rana Tika
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचे सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसे घडले नाही, त्यामुळे त्यांनी अनेकदा जाहीररीत्या नाराजीही व्यक्त केली होती.
पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास, आपण मोठा धमाका करु असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकतेच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी माझ्या संपर्कात सात ते आठ आमदार असल्याचे सांगत आणखी ट्वीस्ट वाढवाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या बाहेरुन विरोधक आरोप करत आहे. हे सुरुवातीपासूनच सुरु आहे. मात्र घरातला माणूस आरोप करतो तेव्हा फार वाईट वाटते. विना पक्षाचा आणि विना पैशाने मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे लोकांच्या मदतांचा आदर प्रत्येकाने करावा. आमदार रवी राणा यांनी कोणाच्या भरवशावर आरोप केले आहे. हे समोर आले पाहीजे, असंही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, राज्यातील सरकार स्थापनेचे सत्ता नाट्य सर्वांनी बघितले. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. मात्र जर माझ्यावर आरोप होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावरील भ्रष्टाचाराचे केले आरोपाचे पुरावे सादर केले नाही तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले सात ते आठ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरला बच्चू कडू कोणता धमाका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
□ राणा एकट्याच्या जीवावर टीका करणार नाही
रवी राणा यांच्याविषयी कडू म्हणाले की, 20 वर्षे आम्ही लोकांमधून निवडून येतो तरी देखील इतक्या खालच्या स्तरावर आम्हाला टीका सहन करावी लागते हे मनाला वेदना देणारं आहे. राणा एकट्याच्या जीवावर ही टीका करणार नाही, तेवढी त्याची कुवत नाही. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे तपासणे गरजेचे आहे. त्यांनी फक्त माझ्या एकट्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही तर 50 आमदार, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार. एवढेच नव्हे तर अमित शाह आणि मोदींवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होणार. गुवाहाटीला नेलेले आमदार हे तुम्ही पैशांच्या जोरावर नेले याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हल्ली झालेल्या एका बैठकीत बच्चू कडूला थंड करायचं असं ठरलं आहे. तो विडिओ माझ्याकडे येणार आहे. केंद्राची मदत घेऊन बच्चू कडूला अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचले जात आहे. आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातलाच माणूस बोट दाखवत असेल तर मी ते बोट छाटल्याशिवाय राहणार नाही. राणा एक बापाची औलाद असेल तर त्याने १ तारखेपर्यंत पुरावे द्यावे. अन्यथा आम्ही १ तारखेला वेगळा निर्णय घेऊ असा इशारा कडू यांनी दिला आहे.