मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली आहे. मी बच्चू कडू यांच्याबाबत केलेलं विधान मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रवी राणा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. Ravi Rana Apologizes; But Bachu Kadu will announce the role tomorrow Amravati Fadnavis Shinde
आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अशातच बच्चू कडूंबाबत वापरलेले शब्द रवी राणांनी मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. मात्र दोघांमधील वाद मिटल्याचं बच्चू कडू यांच्याकडून अद्याप जाहीर झालेलं नाही. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढची भूमिका मांडणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. उद्या आपण आपली भूमिका जाहीर करू, असंही ते म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता. मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्यं निघाली. या वाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मी बच्चू कडू यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेत आहे. असे सांगत अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली तलवार म्यान केली.
रवी राणा हे काल रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी साडेतीन तास चर्चा झाली होती. यानंतर आज सकाळी रवी राणा पुन्हा एकदा फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी काही काळ चर्चा झाल्यानंतर रवी राणा हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यासोबतच्या वादाला मूठमाती देत असल्याची घोषणा केली. मी दिलगिरी व्यक्त केली ते ही शब्द माघार घेतील असं राणा म्हणाले.
बच्चू कडू यांनी उद्या म्हणजे 1 नोव्हेंबर पर्यंत पुरावे सादर करण्याचं आवाहन दिलं होतं. त्यावर आज बच्चू कडू आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या वादावर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यांनी हे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. त्यांचे आभार मानतो. पण माझ्यासाठी कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्याशी बैठक घेऊन उद्या 12 ते 6 वाजता आमचा कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होणार आहे. तेव्हा मी माझी भूमिका घेणार आहे. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ शिंदे गटाचे सर्व 50 आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार?
मुंबई : राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. हा वाद सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. अशातच आता मोठी माहिती समोर येत आहे. शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. टीव्ही 9 मराठीने हे वृत्त दिले आहे.
राज्यात एकीकडे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात खोक्यांवरून वाद पेटला असतानाच, दुसरीकडे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत आहे.
विशेष म्हणजे शिंदे आपल्या सर्व आमदारांसह गुवाहाटी दौरा करणार आहेत. ठाण्यात छटपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिंदेंनी गुवाहाटी दौऱ्याला जाणार असल्याची घोषणा केली. तीन महिन्यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात असताना, एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं होतं. या आमदारांना घेऊन ते थेट गुवाहाटीला निघून गेले होते. शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता.
गुवाहाटी दौऱ्यात मुख्यमंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीचं पुन्हा दर्शन घेणार आहेत. तसेच शिंदे सरकारमधील मंत्री आणि समर्थक आमदार अयोध्या वारीलाही जाणार आहेत. दरम्यान हा दौरा कधी असणार आहे, याबाबतची माहिती मिळालेली नाही.
राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आसाममध्ये मुक्कामाला होते. तेव्हा राज्याचं केंद्रबिंदू हे आसाममधील गुवाहाटी हे होतं. तेव्हाही शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. दरम्यान आता गुवाहाटी दौरा कसा असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांचा फोनवरील संभाषणाचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी “काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्केमध्ये आहोत”, असं विधान केलं होतं. त्यांचं हेच विधान चर्चेला कारण ठरलं होतं. इतकंच नाही तर या दौऱ्यावरून राज्यात खोक्यांचं राजकारणही पेटलं.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं. त्यानंतर राज्यात नवीन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या सगळ्या घडामोडींना आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारासंह गुवाहाटी दौरा करणार आहे.
□ सोमय्यांच्या आरोपांच्या धसक्याने सासूबाईंचे निधन – पेडणेकर
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सासू विजया पेडणेकर यांचे काल (30 ऑक्टोबर) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. किरीट सोमय्या यांनी SRA घोटाळ्यात वारंवार केलेल्या आरोपांमुळे विजया पेडणेकर यांनी धसका घेतला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप पेडणेकर कुटुंबीयांनी केला आहे. माझ्या कुटुंबातील एक बळी घेतला तरी मी चौकशीला सामोरे जाणार, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.