सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार हे कायम वादग्रस्त ठरले आहेत. अखेर त्यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने आज रंगेहाथ पकडले. त्यामुळे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे. ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्यावर आरोप केल्याने लोहार आणखी चर्चेत आले होते. Solapur. Controversial education official turned out to be a bribe-giver; Kiran Lohara was shackled by Global Teachers Disley Guruji
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका संस्थेकडे शासकीय काम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पैशांची मागणी केली. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली.
सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा उशीर झाला होता. तक्रारदार व्यक्ती आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यात तडजोडी झाली. त्यानंतर लोहार यांनी पंचवीस हजार रुपये स्वीकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोहारबरोबर आणखी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी (ता. 31) सायंकाळी सोलापूर जिल्हा परिषदेत सापळा रचला होता. तक्रारदार व्यक्तीकडून २६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहात पकडण्यात आल्याचे प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
लाच घेतल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापुरातील पथकाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.
□ शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे आले चांगलेच चर्चेत
झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे शिक्षणाधिकारी किरण लोहार चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्याविरूध्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी स्वामी यांनी लोहार यांना नोटीस काढून काहीही न बोलण्याचा सल्ला दिला होता.
रविवारी (ता. ३०) किरण लोहार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते लाच घेताना रंगेहाथ पकडले, हे विशेष. लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
》 राष्ट्रवादी महिला आघाडीचं आंदोलन
सोलापूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सोलापूरात राष्ट्रवादी महिला आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ५० खोके एकदम ओक्के असे फलक शासनाविरोधात फडकविले. नुकत्याच झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. याकडे शासनानं तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी महिला आघाडीनं केली. यात लता फुटाणे, विद्या लोळगे, कविता म्हेत्रे, सुवर्णा शिवपुरे, अध्यक्षा सुनिता रोटे, नलिनी चंदेले, खेलबुडे आदी सहभागी झाल्या होत्या.