● कोल्हापुरातील वारकरी असल्याची माहिती
सोलापूर : कार्तिकी एकादशी सोहळ्याला निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना समोर आली आहे. पायी दिंडीत कार घुसली. यामुळे सात वारकरी जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. आठ जण जखमी झाले आहेत. वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत. Sangola Junoni, Solapur, seven warkars were killed when a car rammed into Dindi, Kolhapur Jatharwadi
ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली. तर हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडले.
सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समाजत असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सहा वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरु असून आहेत. सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तुकाराम दामु काशिद रा.सोनंद ता सांगोला (चालक), दिग्विजय माणसीग सरदार (रा.पंढरपूर ता पंढरपूर) असे कार चालकाची नावे समोर येत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अपघातात पाच महिला आणि दोन पुरुष वारकऱ्यांचा समावेश आहे. शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, सरामराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई सुभाष जाधव आणि रंजना बळवंत जाधव (सर्व रा. जठारवाडी ता. करवीर) तर जखमी वारकरी असे, अनिता गोपीनाथ जगदाळे (वय 60), अनिता सरदार जाधव (वय 55), सरिता अरुण सियेकर (वय 45), शानुताई विलास सियेकर (वय 35) आणि सुभाष केशव काटे (वय 67, सर्व रा. जठारवाडी) असे नावे आहेत.
ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना टेम्पोची जोराची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व वारकरी कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते.
या वारकऱ्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत पुढे जात असताना अचानक रस्त्याने जाणारा एक टेम्पो थेट दिंडीत घुसला. या टेम्पोने अनेक वारकऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.