□ वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई तर महसूल विभाग चिडीचूप
पंढरपूर : कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री येणार आहेत हे माहीत असताना सुद्धा पंढरपूर तालुक्यातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई तर महसूल विभाग चिडीचूप असल्याचे बोलले जात आहे. Deputy Chief Minister, Revenue Minister on visit to Pandharpur; However, Devendra Fadnavis Police Revenue Administration continues to collect sand
महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा वारंवार आरोप होत आहे. मात्र पंढरपूर तालुका पोलिसांनी गेल्या पाच दिवसांमध्ये वाळूचे दोन ट्रॅक्टर, तीन पिकअप असा एकूण 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू बंदीचे आदेश दिल्यानंतर देखील महसूल प्रशासनाने त्याला गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. गोपाळपूर, मुंडेवाडी, चळे , आंबे, सरकोली या गावातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू असतो. मात्र महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मात्र परवा पंढरपूर सर्कलमध्ये 11 होड्या फोडून कारवाई केल्याचा फार्स महसूल प्रशासनाने दाखवला आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांनी देगाव येथून वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला आहे. त्यातून एक ब्रास वाळू असा 5 लाख 8 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर मुंडेवाडी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन पिकअप वाहने जप्त केली असून त्यातून दीड ब्रास वाळू जप्त केली आहे. एकूण मुद्देमाल हा 11 लाख 50 हजार रुपयांचा आहे.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून अर्धा ब्रास वाळू असा एकूण 6 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच तावशी येथून अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप पंढरपूर तालुका पोलीस आणि पकडला असून त्यामध्ये अर्धा बालास वाळू असा एकूण 8 लाख रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या नेमलेल्या पथकाने केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच गुरूवारी सोलापूर दौ-यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी गुरूवारी ( ३ नोव्हेंबर) सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्यात येणार असल्याचे भाजप नेत्यांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. शुक्रवारी (४ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री शासकीय महापूजा होईल. देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवारी रात्री पंढरपुरात आगमन होईल.
शासकीय महापूजा झाल्यानंतर नोव्हेंबर रोजी ते तालुक्यात आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर्सच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दुपारी अडीच वाजता एका खासगी सोयाबीन प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यान्वित झालेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.