सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नुकतीच माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांना समवेत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे तालुक्यात तर्क वितरकांना उधाण आले आहे. MLA Shahjibapu Patil shot a ‘great’ arrow, Uttamrao Jankar’s heart came, Fadnavis turns politics on BJP
शहाजीबापूंनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा तीर मारण्याचा ‘उत्तम’ प्रयत्न केला असला तरी मोहिते-पाटील यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोलापूर जिल्हा भाजपाचा गड झाला आहे. अपक्षासह ७ आमदार आणि दोन खासदारांमुळे पक्ष भक्कम स्थितीत आहे. अल्पावधीत भाजपाने राजकीय किमया साधत सोलापूर जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.
सत्तांतरानंतर भाजपात येण्यासाठी अनेक नेते उत्सुक झाले आहेत. अशातच आता शिंदे गटाचे आमदार असलेले शहाजीबापू पाटील यांनी उत्तम जानकर यांना घेऊन थेट फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे जानकर राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात आहेत की काय अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजप-सेनेची सत्ता असताना जानकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाजपबरोबरच होते. त्यांना माळशिरसमधून उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. मात्र ऐनवेळी भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिल्याने जानकर यांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. आता फडणवीस यांची भेट घेतल्याने जानकर पुन्हा भाजपच्या जवळ येणार का, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
पंढरपूर । श्री विठ्ठल कारखान्यावर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड
सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. परंतु कोणत्या वर्षातील कारखान्यातील जीएसटीची कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. याबाबत गूढ कायम राहिले आहे. यामुळे पंढरपूर व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या विविध संस्थांवर
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. त्यानंतर काही महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोपर्यंत जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल कारखान्यावर मंगळवारी छापा टाकला. हे अधिकारी नेमक कोणत्या कालावधीतील हिशेब तपासत आहेत हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
मागील वर्षी कारखान्याचे सभासद संजय पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे अधिकारी तपासणीला आले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गाळपाची, साखरेची, मळी, ऊस भुसा, प्रेसमड, मोलॅसिस यांच्या विक्रीतून कारखान्याला उत्पन्न मिळत असते. हे व अन्य साहित्य विक्री करताना कारखान्याने जी. एस. टी. भरला आहे का? याची देखील तपासणी होण्याची शक्यता असल्याची चर्चा दिवसभर पंढरपूरमध्ये रंगली होती.