पंढरपूर – येथील कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्य वळण रस्ता) या रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून आज येथे करण्यात आले. Bhoomipujan of Korti to Wakhri Road Pandharpur by Deputy Chief Minister Devendra Fadnavis
यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रांत अधिकारी गजानन गुरव, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
श्री क्षेत्र देहू आळंदी पंढरपूर नेवासा पालखीतळ आणि मार्ग विकास आराखडा अंतर्गत तीर्थक्षेत्र मौजे पंढरपूर येथील कोर्टी ते वाखरी या ३ किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी रुपये 15 कोटी 27 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा कार्यारंभ आदेश 14 सप्टेंबर 2022 रोजी काढण्यात आला आहे. या रस्ता कामासाठी एकूण 35,923.37 चौ. मी. क्षेत्र भूसंपादित करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी क्षेत्र 20553.88 चौ. मी. व शासकीय क्षेत्र 14749.49 चौ मी. संपादित केले आहे.
या कामामध्ये भरावकाम, जी.एस.बी. काम, डब्ल्यू. एम. एम. काम, डी. बी., दोन पुलमोऱ्या बांधणे, रोड जंक्शन सुधारणा करणे, रोड साइड फर्निचर करणे, गटार काढणे आदि कामांचा समावेश आहे. कामासाठी जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून संपादित जागा शासनाच्या ताब्यात आहे.
पंढरपूर शहरामध्ये सद्यस्थितीत अनवली, कासेगाव, मंगळवेढा, सांगोला, टाकळी व कराड रस्ता येथून येणारी वाहतूक ही बाह्यमार्गाद्वारे जाणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बाह्यवळण रस्ता पंढरपूर शहरालगत करण्यात आला आहे. रस्त्यावरून येणारी वाहतूक पंढरपूर नगरपरिषद हद्दीतून व उपनगरातून जात आहे.
या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टी वाखरी रस्ता पर्यायी बाह्यवळण रस्ता म्हणून वापरला जाणार आहे. वारकरी भाविकांना अधिकच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचा उपयोग होणार आहे
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ऊसदरासाठी कामतीत रास्ता रोको आंदोलन
विरवडे : शेतकऱ्यांच्या उसाला 2500 रुपये पहिली उचल आणि सहाशे रुपये दुसरा हप्ता असा 3100 रु प्रति टन भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी मोहोळ तालुका ऊस दर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यावतीने कामती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भागातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
दरम्यान शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सिद्धाराम म्हमाणे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, बाळासाहेब वाघमोडे, गणेश जाधव, नितीन मस्के, इक्बाल मुजावर, पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना कारखानदारानी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाना चालू नये. तसेच वाहन मालकांनी वाहतूक करणे व शेतकऱ्यांनीही ऊस देऊ नये अशी मागणी यावेळी आंदोलकानी शेतकऱ्यांनी केले. स्वाभिमानीचे नेते पप्पू पाटील यांनी भीमा निवडणुकीच्या प्रचाराला ३१०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय फिरकू नये, असे आवाहन केले.
यावेळी कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. यामुळे उसाचा दर हा एफआरपीपेक्षा जादा देण्यात यावा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2500 रुपये पहिला हप्ता तर सहाशे रुपये दुसरा हप्ता असा प्रती टन 3100 भाव देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी प्रकाश पारवे, मुकुंद अवताडे, प्रहारचे तालुकाध्यक्ष वैभव जावळे, विष्णू कदम, नरसिंग पाटील, नाना खांडेकर, आनंद कस्तुरे, संतोष अवताडे, गोरख पवार, गणेश चव्हाण, रवी पवार, हणमंत खळसोडे, आबा भोसले, जामुवंत बचुटे, शंकर कपणे, बजीरंग अधटराव, संभा काळे, इरप्पा शेंडगे, अविनाश पारवे, अर्जुन लोखंडे यांच्यासह कामती, कोरवली, हारळावाडी, विरवडे, दादपूर आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते.