विरवडे बु : शेतकऱ्यांच्या उसाला 2500 रुपये पहिली उचल आणि सहाशे रुपये दुसरा हप्ता असा 3100 रु प्रति टन भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी मोहोळ तालुका ऊस दर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यावतीने कामती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भागातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते. Mohol Solapur Usdar Sangharsh Committee Farmers in Kamati Rasta Roko Andolan for sugarcane
दरम्यान शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सिद्धाराम म्हमाणे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, बाळासाहेब वाघमोडे, गणेश जाधव, नितीन मस्के, इक्बाल मुजावर, पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना कारखानदारानी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाना चालू नये. तसेच वाहन मालकांनी वाहतूक करणे व शेतकऱ्यांनीही ऊस देऊ नये अशी मागणी यावेळी आंदोलकानी शेतकऱ्यांनी केले. स्वाभिमानीचे नेते पप्पू पाटील यांनी भीमा निवडणुकीच्या प्रचाराला ३१०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय फिरकू नये, असे आवाहन केले.
यावेळी कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. यामुळे उसाचा दर हा एफआरपीपेक्षा जादा देण्यात यावा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2500 रुपये पहिला हप्ता तर सहाशे रुपये दुसरा हप्ता असा प्रती टन 3100 भाव देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी प्रकाश पारवे, मुकुंद अवताडे, प्रहारचे तालुकाध्यक्ष वैभव जावळे, विष्णू कदम, नरसिंग पाटील, नाना खांडेकर, आनंद कस्तुरे, संतोष अवताडे, गोरख पवार, गणेश चव्हाण, रवी पवार, हणमंत खळसोडे, आबा भोसले, जामुवंत बचुटे, शंकर कपणे, बजीरंग अधटराव, संभा काळे, इरप्पा शेंडगे, अविनाश पारवे, अर्जुन लोखंडे यांच्यासह कामती, कोरवली, हारळावाडी, विरवडे, दादपूर आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आंदोलनासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
सोलापूर । ‘हर हर महादेव’ चे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मार आंदोलन
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नुकताच आलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अनेक इतिहासाला सोडून असलेल्या घटना व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वेळोवेळी अपमानास्पद उल्लेख दाखविला आहे. त्यामुळे सोलापुरात अभिजित देशपांडे यांचा निषेध केला जात आहे.
अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट चुकीच्या इतिहासावर आधारित असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेड च्या वतीने भागवत थिएटर येथे शिवद्रोही दिग्दर्शक अभिजित देशपांडे याच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
बाजीप्रभू यांच्या तोंडी, मला शिवाजी शहाजी भोसले यांचा जीव घ्यायचा आहे ही वाक्य इतिहासाचे विकृतीकरण करणारे आणि इतिहासाला काळिमा फसणारे आहे. तसेच जनतेची दिशाभूल करणारे आहे. दिग्दर्शक आणि लेखक धंदा करण्याच्या नादात जो चुकीचा इतिहास दाखवत आहेत. त्यामुळे समस्त इतिहास प्रेमींच्या आणि शिवशंभू प्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांना बंडखोर, वेळोवेळी एकेरी नावाने उल्लेख, जो आपल्या पित्याच्या नाही तो कोणाचाच नाही, यांची (छत्रपती शिवाजी महाराज) मगरूरी मोडतो, मागच्या वेळी तिथेच गाडला असता (छत्रपती शिवाजी महाराज यांना), अफजल खानाचा वध व त्याचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेला हल्ला जाणूनबुजून वगळण्यात आला आहे.
अशा एक ना अनेक अपमानास्पद एकेरी व अनैतिहासिक घटना बाजी प्रभू देशपांडे यांच्या मुखातून दाखविण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर या चित्रपटात बादंल सेनेचे सेवेकरी असलेले वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या आडून छत्रपती व स्वराज्य निष्ठ असणार्या बादंल सेनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अठरापगड बारा बलुतेदारांचे स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणूनबुजून दुर्लक्षित दाखवत फक्त आणि फक्त एका विशिष्ट उच्चवर्णीय समाजाचा उदोउदो करण्यात आला असल्याचे म्हटले. यावेळेस अभिजित देशपांडे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख सिताराम बाबर, संघटक रमेश चव्हाण, उपशहरप्रमुख प्रमुख गजानन शिंदे, संघटक दत्ता जाधव, शाहू लामकाने, धनंजय लांबकाणे, राजेंद्र माने यांची उपस्थिती होती.