कुर्डूवाडी : पोलीस भरतीसाठीचा अभ्यासिकेतून गावाकडे दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला समोरून येणाऱ्या पिकअपची धडक लागून दुचाकीवरील एक विद्यार्थी जागेवर मयत झाला तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. Solapur. A student studying police recruitment killed in an accident, female clerk bribed
ही घटना बुधवारी (दि.२) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी – बार्शी रस्त्यावर चिंचगाव (ता.माढा) जवळ घडली. शुभम भागवत उबाळे (वय २१ ) असे अपघातात मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरील शुभंम भागवत उबाळे (वय २१ ) ,दयानंद विठ्ठल उबाळे (वय २१ दोघे रा. चिंचगाव ता.माढा) हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून कुर्डुवाडी येथील अभ्यासिकेतून अभ्यास करुन सायंकाळी ६ वा सुमारास गावी चिंचगाव ता.माढा येथे दुचाकीवर डबलसीट जात होते.
समोरून बार्शीकडून येणाऱ्या पिकअप( एम एच १९ सीवाय ७३००) ची धडक बसून दुचाकीवरील शुभंम भागवत उबाळे (वय २१ ) हा जागीच मयत झाला तर दयानंद विठ्ठल उबाळे (वय २१) हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात आले आहे. घटना स्थळावरील नागरिकांनी पिकअप चालक फिरोज निजामुद्दीन अहमद ( वय.२९ , उत्तर प्रदेश) यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 लाच घेताना कोषगार कार्यालयातील महिला लिपीक अँटीकरप्शनच्या जाळ्यात
सोलापूर – वडिलांच्या निधनानंतर आईस मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनचे बिल वेळेत काढून देण्यासाठी ६ हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपीक अश्विनी देविदास बडवणे (वय ३४ रा.२१ सिद्धेश्वरनगर सैफुल, विजापूररोड,सोलापूर) हिला अॅन्टीकरप्शनला पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई बुधवारी (ता. 2) सायंकाळच्या सुमारास कोषागार कार्यालयात घडली. या घटनेतील तक्रारदार यांचे वडील २०२१ साली निधन पावले. त्यांच्या आईस मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनचे बिल वेळेत मिळण्याकरिता त्यांनी कोषागार कार्यालयात अर्ज केला होता. ते काम करून देण्यासाठी महिला लिपीक अश्विनी बडवणे हिने ६ हजाराची लाच मागितली होती.
दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. ठरल्या प्रमाणे तक्रारदाराने काल मंगळवारी दीड हजार रुपये तिला अॅडव्हॉन्स त्यांना दिले होते. उर्वरित ४ हजार ५०० रुपये बुधवारी देण्यासाठी तक्रारदार कार्यालयात गेले होते. ती लाचेची रक्कम बिल रजिस्टर मध्ये ठेवण्यास अश्विनी हिने सांगितली. त्याप्रमाणे तक्रारदाराने लाचेची रक्कम रजिस्टर मध्ये ठेवली. ती रक्कम घेत असताना लाचलुचपतच्या पथकाने अश्विनी बडवणे हिला रंगेहात पकडले. तिच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात केला.
ही कारवाई अँटिकरप्शनचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक, महिला हवालदार अर्चना स्वामी, हवालदार प्रमोद पकाले, उमेश पवार आणि शाम सुरवसे आदींनी केली .