□ आरोग्यमंत्री प्रा. सावंत यांच्याकडून स्वागत
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये चिंतन शिबिर चालू असताना सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्षासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सांवत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. Entry of NCP women office bearers into Shiv Sena Shinde group, response from NCP too
राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफुस आता चव्हाट्यावर आली आहे. जुने आणि नवे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. त्याशिवाय शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या रूपाने सुरूवातीला ही खदखद बाहेर आली. कोल्हे यांनी आरोग्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन लवकरच मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. कोल्हे यांच्यासमवेत राष्ट्रवादीमधील नाराज मंडळी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्याची सुरूवात महिला आघाडीपासून झाली आहे.
राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुनंदा साळुंके, शहर मध्य विधानसभा अध्यक्षा राजश्री कोडनूर, शहर कार्याध्यक्षा मनीषा नलावडे, शहर उपाध्यक्षा जयश्री पवार, अश्विनी भोसले, मारता आसादे, शोभा गवळी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिंदे गटात गेलेल्या महिलांच्या प्रतिक्रियेस अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या सर्वांचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वागत केले आहे. यावेळी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चरणराज चवरे, महेश चिवटे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, दिलीप कोल्हे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, संजय सरवदे, राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून ज्या काही महिला पदाधिकारी म्हणून शिंदे गटात प्रवेश केला आहे त्या महिलांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही पद देण्यात आलेले नव्हते. मागील सात वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ती पदे होती पण सध्या शिंदे गटात प्रवेश केलेल्या महिलांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही पद नाही. शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी कोणतेही पत्र किंवा राजीनामा दिलेला नसल्याचे महिला राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वच महिला पदाधिकाऱ्यांना न्याय मिळतो. पक्ष सोडून गेलेल्या काही महिलांना काम नको केवळ सन्मान हवा होता. यापैकी काही जणी माजी पदाधिकारी आहेत. कोणत्याही विद्यमान पदावर नव्हत्या. काहीजणींना गैरसमज करुन नेण्यात आले. लवकरच पत्रकार परिषद घेउन भूमिका मांडणार असल्याचे सुनीता रोटे (महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी सांगितले.