सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कार्तिक एकादशीच्या पूजेच्या निमित्ताने पंढरपूर दौऱ्यावर आले असता,माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची पंढरपूर दौऱ्यातील गैरहजेरी दिवसभर चर्चेचा विषय ठरली. Former Guardian Minister Vijay Kumar Deshmukh turned his back on Deputy Chief Minister Fadnavis’ visit to Pandhari
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात पूजेनंतर आमदार समाधान अवताडे व माजी आमदार परिचारक यांच्या कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित असताना,माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अनुपस्तिथीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती
नुकतेच नूतन पालकमंत्री विखे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यात देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी गैरहजेरी लावल्याने ते नाराज आहेत का? अशी चर्चा सुरू होती व आतातर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे त्यांनी पाठ फिरवल्याने, पुन्हा तीच चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूरसह राज्यातील 13 जिल्हा बँकांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या
सोलापूर : प्रशासक असलेल्या पाच व संचालक मुदत संपणाऱ्या ८ अशा १३ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहेत. यात सोलापुरातील जिल्हा बँकेचाही समावेश आहे. आता पुढील वर्षातील मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही बाब न्यायालयात गेल्यानंतर थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्या. मात्र, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश नाही. प्रशासक नियुक्त असलेल्या बँकांच्या प्रशासकांना डिसेंबरपर्यंत होती. मुदतवाढ देण्यात आली होती.
सध्या सोलापूर, नागपूर, नाशिक, बुलडाणा व वर्धा या जिल्हा बँकांवर प्रशासक आहेत; तर पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद व कोल्हापूर या बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपत आहे. या १३ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील १३ जिल्हा बँकांच्या निवडणुका मार्च महिन्यात घेण्यासाठीची कार्यवाही सुरु आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे सहकारमंत्री अतुल सावे यांनी म्हटले.