मुंबई : अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवार पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या ऋतुजा रमेश विजयी झाल्या, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील केली. यात विजयापेक्षा नोटाला पडलेल्या मतांची होत असून नोटाचा प्रचार कोणी केला, याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे. Andheri East Rituja Latke wins with majority, talk of ‘nota’ rather than victory; Who promoted the note BJP?
तर या निवडणुकीत नोटाला 12,806 इतके अनपेक्षित मतदान झाले आहे. यावेळी पाटील यांनी त्यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघाडीवर होत्या. ऋतुजा लटके 53471 मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान, हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे. त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये, अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिली आहे.
सातव्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंना 21,090 मतं मिळाली असून चर्चा मात्र नोटाची होत होती. त्यावेळेस नोटाला 4,712 मतं मिळाली होते. दुसऱ्या क्रमांकावर नोटा होते. ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित असला तरी चर्चा मात्र नोटाला मिळालेल्या मतांची होताना दिसत आहे. अकराव्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंना 42,343 मतं मिळाली तर नोटाला 8,379 मतं मिळाली होती. त्यावेळेसही दुसऱ्या क्रमांकावर नोटाच होते. ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित होता नोटाला मिळालेली मतं अपक्ष उमेदवारांपेक्षाही अधिक आहेत. नोटाला मिळालेली मतं चर्चेचा विषय ठरली आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 90 ते 95 टक्के मतं मिळतील, असा अंदाजही व्यक्त केला होता. दरम्यान, ऋतुजा लटके पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही जास्त मतांनी विजयी ठरल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी ऋतुजा लटके याचा विजय आवश्यक होता. भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता.
भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे.
इतर सर्व अपक्षांच्या मतांची बेरीज नोटांला मिळालेल्या मतांइतकीही होऊ शकली नाही. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत ऋतूजा लटके यांचा सामना अपक्षांशी नाही तर नोटाशी झाला. मात्र यामध्ये ऋतूजा लटके यांचा मोठ्या फरकाने विजय मिळाला.
भाजपाच्या प्रचारामुळे नोटाच्या मतांचा आकडा वाढला की, लटके यांच्याविरोधात तुल्यबळ पर्यायी उमेदवार नसल्याने मतदारांनी नोटाला पसंती दिली, हे स्पष्ट झालेले नाही. कारण रिंगणातील इतर सहा उमेदवारांपैकी एकानेही मतांची पाच आकडी संख्या गाठलेली नाही. अन्यथा ही निवडणूक थोडीतरी चुरशीची झाली असती. मात्र, नोटाला झालेले मतदान हे भाजपला मिळालेली मते आहेत, असे सूचक वक्तव्य ऋतुजा लटके यांनी केले आहे.
□ पोटनिवडणूक – भाजपाचा 4 जागांवर विजय
देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. यातील 4 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ, बिहारमधील गोपालगंज, ओडिशातील धामनगर आणि हरियाणातील आदमपूरमधून भाजपाने विजय मिळवला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. तेलंगणात टीआरएस आणि बिहारमधील आरजेडीच्या उमेदवार नीलम देवी यांनी विजय मिळवला आहे.