● सहा महिन्यांपासून शिक्षकांची होरपळ, लाचेसाठी बिले प्रतीक्षेत का ?
● जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांना सही करण्यास वेळ मिळेना
सोलापूर / बळीराम सर्वगोड
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे ४०० पेक्षा जास्त वैद्यकीय बिले सहीच्या प्रतीक्षेत असून, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांना त्या वैद्यकीय बिलावर सह्या करण्यास वेळ मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांची होरपळ होत असल्याची प्रक्रिया शिक्षकांतून येत आहे. Horpal of teachers: 400 medical bills of primary teachers waiting for signature?Solapur
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मागील ६ महिन्यापासून प्राथमिक शिक्षकांचे सुमारे ४०० वैद्यकिय देयके प्रलंबित आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना देवकावर सही करण्यासाठी वेळच मिळत नसल्याचा आरोप गुरुसेवा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शिक्षण विभागापाठोपाठ आरोग्य विभागाच्या कारभाराची लक्तरी वेशीवर आली आहेत. सोलापूर जिल्हा शिक्षक संघटनेच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने शिक्षक संघाचे सरचिटणीस सूर्यकांत हत्तूरे, शिक्षक पतसंस्थेचे नूतन संचालक रामभाऊ यादव व रमेश घंटेनवरु, अक्कलकोट संघाचे अध्यक्ष अभिजित सुर्डीकर व नारायण घेरडी आदींच्या शिष्टमंडळाने याबाबत शुक्रवारी थेट जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे केबिन गाठले पण तेथे आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव असले तर नवलच अशी प्रतिक्रियाही शिक्षकांनी यावेळी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात नसल्याने शेवटी तेथील प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देऊन याविषयीचे गहाणे मांडण्यात आले.
एकीकडे फाईल मंजूर झाल्यानंतर वर्ष वर्ष तरतूद मिळत नाही. मंजूर < होण्यापूर्वी फाईल पूटअप व्हायला सहा महिने, त्रुटींची पूर्तता होऊन पुन्हा फाईल रिस्टॅन्ड व्हायला चार महिने, एवढ्या कालावधीतीनंतर आरोग्य विभागात फाईल सहा सहा महिने – राहत असतील तर वैद्यकिय देयके सादर न केलेली बरी अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी नागेश पाटील यांनी लगेच निवेदनाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना ऑनलाईन प्रणालीने पाठवून दिला.
□ लाचेसाठी बिले प्रतीक्षेत का ?
जि. प. प्राथमिक शिक्षण विभागातील लाचखोरीने जिल्हा परिषद समाजात बदनाम ठरत आहे. आरोग्य विभागाकडूनही शिक्षकांची होणारी हेळसांड पाहता प्रलंबीत फाईली या सुध्दा लाचेच्या प्रतीक्षेत आहेत का? असाही प्रश्न शिक्षक वर्गात विचारला जात आहे.
□ जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा पदभार काढावा
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे असलेले कार्यालयात वारंवार गैरहजर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार काढून घेण्यात यावा, अशी चर्चा शिक्षकांमध्ये होत आहे. त्यामुळे याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे लक्ष घालणार का ? फक्त शांत बसणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूरसह राज्यातील 13 जिल्हा बँकांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या
सोलापूर : प्रशासक असलेल्या पाच व संचालक मुदत संपणाऱ्या ८ अशा १३ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहेत. यात सोलापुरातील जिल्हा बँकेचाही समावेश आहे. आता पुढील वर्षातील मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही बाब न्यायालयात गेल्यानंतर थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्या. मात्र, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश नाही. प्रशासक नियुक्त असलेल्या बँकांच्या प्रशासकांना डिसेंबरपर्यंत होती. मुदतवाढ देण्यात आली होती.
सध्या सोलापूर, नागपूर, नाशिक, बुलडाणा व वर्धा या जिल्हा बँकांवर प्रशासक आहेत; तर पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद व कोल्हापूर या बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपत आहे. या १३ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील १३ जिल्हा बँकांच्या निवडणुका मार्च महिन्यात घेण्यासाठीची कार्यवाही सुरु आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे सहकारमंत्री अतुल सावे यांनी म्हटले.