□ ३१३ जनावरांचा मृत्यू; ८४ जनावरांच्या मालकांना २० लाखांचे वाटप
□ १३५ मृत पशुधनाच्या ६८ लाखांच्या प्रस्तावास आज मान्यता मिळणार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लम्पीचा संसर्ग वाढला आहे. सर्व अकरा तालुक्यात या रोगाची व्याप्ती पसरली आहे. या रोगामुळे आता पर्यंत ३१५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाने केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे आठवड्यात सर्व तालुक्यातून लम्पी जिल्ह्यातून हद्दपार होणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. Solapur. Lumpy will be deported in a week; Claim of District Animal Husbandry Department
कोरोनानंतर लम्पीची मोठी लाट सोलापूर जिल्ह्यामध्ये आली होती. याचा मोठा फटका जिल्ह्यातील ७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांच्या पशुधनास बसला होता. या रोगाने जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ७१६ गावातील तब्बल सहा हजार ३८ जनावरे बाधित झाली होती. त्यामध्ये पाच हजार ७५ गायी, ९९३ बैलांचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणात राबवलेल्या लसीकरणामुळे २ हजार २४५ जनावरे बरी झाली आहेत. त्यामध्ये १ हजार ८४५ गायी आणि ४०० बैलांचा समावेश आहे. तर ३१३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गायी १७१, बैल २७ आणि ११५ वासरांचा समावेश आहे. सध्यस्थितीला ३ हजार ५१० जनावरे बाधित आहे. त्यामध्ये २ हजार ९२७ गायी, ५३३ बैलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी ७ लाख ४५ हजार ५०० लसींचे डोस प्राप्त झाले होते.
लसीचे वाटप १७२ टीमच्या माध्यमातून लसीकरण केले आहे तर बाधित १०१२ गोठ्यांची फवारणी केली आहे. लम्पीसाठी जिल्ह्यामध्ये ९५८ ठिकाणी जनजागृती केली आहे. यामुळे आठवड्यात हा लम्पी जिल्ह्यातून हद्दपार होणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ २० लाख वाटप ; ६८ लाखांचा प्रस्ताव
मृत्यू झालेल्या ३१३ जनावरांच्या मालकांना २० लाख ३५ हजारांचे वाटप केले आहे. यामध्ये ४१ गायी, १३ बैल आणि ३० वासरांचा समावेश आहे. दुधाळ जनावरांसाठी ३० हजार, बैलांसाठी २५ हजार आणि वासरांसाठी १५ हजार नुकसान भरपाई दिली जाते. दुसऱ्या टप्प्यातील १३५ मृत पशुधनाच्या आर्थिक मदतीचा ६८ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. दोन दिवसात याला मान्यता मिळणार आहे.
□ तालुकानिहाय बाधित आणि मृत पशुधन
अक्कलकोट (एक मृत, ८७ बाधित), बार्शी (एक मृत, १८ बाधित), करमाळा (९३ मृत, ९८८ बाधित), माढा (२५ मृत, १७७ बाधित), माळशिरस (१०० मृत, ११०८ बाधित), मंगळवेढा (६ मृत, ४५ बाधित), मोहोळ (३ मृत, ३४ बाधित), उत्तर सोलापूर (१६ मृत, २५ बाधित), पंढरपूर (२० मृत, २०५ बाधित), सांगोला (२९ मृत ५९८ बाधित). दक्षिण सोलापुरात (३ मृत, ३२ बाधित )
● मृत्यूचे प्रमाण होतंय कमी
> पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि लसीकरण मोहीम घेतली आहे. लसीकरणामुळे बाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. बाधित पशुधन पाहता आठवड्यात लम्पी आटोक्यात येईल. मृत पशुधनाच्या मालकांना २० लाखांचे वाटप झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील ६८ लाखांच्या प्रस्तावास दोन दिवसात मान्यता मिळणार आहे. त्यानंतर तत्काळ वाटप केले जाईल.
– डॉ. एन. एल. नरळे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)