मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेतल्याच्या आरोप केला. याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. Agriculture Minister’s Tongue Slipped; Broken glass of the bungalow, arson and stone pelting Abdul Sattar Supriya Sule
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या बंगल्यात घुसून खिडक्यांची तोडफोड केली. बंगल्याबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तारांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत.
मंत्री सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घरावर दगडफेकही केली. यात खिडक्यांच्या दरवाजाच्या काचा फुटल्या. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
कृषीमंत्री सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवासस्थानी तोडफोड केलीय. सोबतच राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई ठाण्यासह पुणे, नागपूर, बीडमध्ये राष्ट्रवादीची आंदोलन सुरू आहेत.
सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक 'बदला' घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात.आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या.#जाहीर_निषेध
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवासस्थानी तोडफोड केलीय.
आता सत्तार यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी राज्यातील काेणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. राजकारणामध्ये टीका हाेतच असते.यातूनच मी बाेललाो. माझ्या विधानामुळे अवमान झाला असे वाटत असेल तर मी सारी म्हणतो, असे म्हटले.
आमदार रोहीत पवार यांनीही ट्विट करत अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध वक्तव्य केला आहे,’
कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही. सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?
सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक ‘बदला’ घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात. आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या.’
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘आम्हालाही बोलता येत पण, आम्ही तसं बोलणार नाही. माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरणे अवघड करु. असे म्हणाले. राष्ट्रवादीकडून त्यांना शब्द मागे घेण्यासाठी २४ अल्टीमेटस देण्यात आला आहे. ट्विट करतही त्यांनी संताप व्यक्त केले आहे. ‘अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल.’