मुंबई : मुंबई महानगर पालिकेतून ‘मातोश्री’वर खोके येणे बंद झाल्याची खंत रश्मी ठाकरेंना असल्याचे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत आहे. तोंडाने पक्ष फोडून त्यांनी पाप केले. हे दोन गट त्यामुळेच झाले आहेत, असेही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. Finally Deepali will go to Syed Shinde group, criticized Rashmi Thackeray
ठाकरे गटाला दुपारी पाठींबा देऊन रात्री शिंदे गटात सामिल झाल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्ये केल्याने त्या कोणत्या नवीन गटात सामील होणार यावर उठलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळत आहे. त्या शिंदे गटात सामील होणार आहेत. आपण लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करू असं दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या.
दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दीपाली सय्यद यांच्याकडून शिवसेनेच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यात येत होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली होती.
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणले होते. त्यामुळे आता त्यांना साथ देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दीपाली सय्यद यांना 33,644 मते मिळाली होती. तर, जितेंद्र आव्हाड यांना 1,09,283 मते मिळाली होती.
दीपाली सय्यदनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला आहे. शनिवारी (ता. १२) दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याने रश्मी वैहिनींना दुःख झालं, असा गौप्यस्फोट सय्यद यांनी केला आहे. खोके खोके सरकार जे भाष्य केलं जातं आहे. त्या खोक्यांचं खरं राजकारण लोकांना कळलं पाहिजे, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ या कारणामुळे शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात 14 दिवस ही यात्रा राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या यात्रेत सहभागी होणार नाहीत. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सुरू झाली आहे. ते चौदा तास महाराष्ट्रात यात्रेतून लोकाच्या समस्या जाणून घेणार आहेत. या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहतील, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता आलेल्या माहितीनुसार शरद उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भारत जोडी यात्रेला जाण्याची शक्यता धूसर असली तरी, ‘भारत जोडो’ या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत 10 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. या सोबतच राहुल गांधी यांच्या जाहीर सभेतही उपस्थित राहणार आहेत. या प्रवासाचा एक भाग होण्यासाठी. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हेही उद्या ‘भारत जोडी यात्रेत’ सामील होणार आहेत.
शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. 31 ऑक्टोबरला शरद पवार यांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरालाही दुसऱ्या दिवशी काही वेळासाठीच शरद पवार यांना उपस्थित राहता आले. दोन दिवसांपूर्वी आठ दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला असला तरी, अद्याप त्यांना आरामाची गरज असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये शरद पवार राहणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.