Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

कोल्हापुरात उसाला चांदी ; सोलापूरसह अन्यत्र दुष्काळच

Usdar silver in Kolhapur; Solapur and other sugarcane factories due to drought

Surajya Digital by Surajya Digital
November 9, 2022
in Hot News, महाराष्ट्र, शिवार, सोलापूर
0
कोल्हापुरात उसाला चांदी ; सोलापूरसह अन्यत्र दुष्काळच
0
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर / सोलापूर : ऊस पिकवण्याचा खर्च एकसारखाच; पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडणाऱ्या भावात लक्षणीय फरक पडत असल्याचे आकडेवारी दर्शवीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन ३२०९ रुपये असा सर्वोच्च दर बिद्री कारखान्याने दिला आहे. राज्यात अन्यत्र कोल्हापूरपेक्षा प्रतिटन ६०० ते ७०० रुपये इतका कमी दर मिळत असताना तेथे उस दराच्या आंदोलनाची तीव्रता तितकीशी नाही. Usdar silver in Kolhapur; Solapur and other sugarcane factories due to drought

 

आधीच्या वर्षांच्या तुलनेने गेल्या हंगामात साखर कारखान्यांना बरे दिवस होते. साखर कारखान्याच्या तिजोरीत चांगली रक्कम आली. पूर्वीचा तोटा, कर्ज व्याज यामुळे मोठा नफा झाल्या नसल्याचे साखर कारखानदारांकडून सांगितले जात आहे. शेतकरी संघटनेने याला आक्षेप घेतला आहे. यावर्षीचा हंगाम सुरू होत असताना राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात असलेला दरात बरीच तफावत असल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाची रक्कम अदा केली आहे. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊन शेतकऱ्यांचा ऊस आपल्या कारखान्याकडे यावा असेही धोरण घेतले आहे. साखर कारखानदारीतील स्पर्धाही पुढे आली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या वार्षिक सभेत जिल्ह्यातील सर्व कारखाने एफआरपी देतील, असे सांगितल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता कारखाने सुरू होत असताना साखर उतारा अधिक असलेल्या कारखान्यांनी तीन हजारांहून अधिक दर देण्याचे जाहीर केले आहे.

परतीचा पाऊस खरोखरच परतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात गळीत हंगाम गती घेऊ लागला आहे. कोल्हापुरातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची ग्वाही दिली असताना राज्यात अन्यत्र एकरकमी एफआरपी देण्याबाबत आशादायक चित्र नाही. तुरळक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरित कारखान्यांनी मागील हंगामाप्रमाणे दोन वा तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची भूमिका घेतली आहे. तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पिकवण्याचा खर्च समान असतानाही एफआरपीनुसार मिळणारा दर हा कोल्हापूरच्या तुलनेने खूपच कमी आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी अडीच हजार रुपये देण्यात आले होते. सर्वाधिक दर देण्याचा दावा करणाऱ्या पांडुरंग साखर कारखान्याने तीन टप्प्यांत २३३१ रुपये दर दिला होता. सोलापूर जिल्ह्यात ४७० कोटी रुपये गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे.

पावसाने हात दिल्याने मराठवाड्यात ऊस पीक भरमसाट आले होते. इतके की लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी पाठवावा लागला. या दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांना प्रतिटन एक हजार रुपये कमी दर मिळाला असून त्याचे पैसे अजूनही आलेले नाहीत, अशा तक्रारी आहेत. मराठवाड्यात सरासरी २३०० रुपये तर नगर जिल्ह्यात सरासरी २४०० रुपये दर मिळत आहे. कोल्हापूरपेक्षा राज्याच्या अन्य भागांत प्रतिटन ६०० ते ७०० रुपये इतका कमी दर घ्यावा लागत आहे.

 

● दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्यातर्फे ३२०९ रुपये

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रति टन ३२०९ रुपये असा विक्रमी दर जाहीर केल्याने त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. बिद्रीच्या माजी संचालकांनी एफआरपीनुसार दर देणे बंधनकारक असल्याने एफआरपीपेक्षा ५०० रुपये अधिक द्यावेत, अशी मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणखी ३०० रुपये देण्याची मागणी लावून धरली आहे.

 

》डाळिंबाची पंढरी म्हणून अकलूजची नवी ओळख

सोलापूर : शंकरराव मोहिते-पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीची नवी ओळख डाळिंबाची पंढरी म्हणून होऊ लागली आहे. बाजार समितीमध्ये भगव्या डाळिंबाला प्रतिकिलो २२१ रूपये भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

बाजार समितीच्या लिलावामध्ये अमित जाधव यांचे श्री जय अंबे फ्रूट कंपनीमध्ये मनोज वाघमोडे या शेतकऱ्याच्या भगवा जातीच्या डाळिंबास २२१ रूपये प्रतिकिलो असा विक्रमी दर मिळाला.

 

याप्रसंगी व्यापारी खंडू जाधव, नागेश केदार, सादिक बागवान आदी उपस्थित होते. समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्याने सचिव राजेंद्र काकडे यांच्या नियोजनानुससार अकलूज ही ऊस क्षेत्राबरोबरच डाळिंबाची पंढरी म्हणून नावारुपाला येत आहे. यामुळे माळशिरस तालुक्यात डाळिंब क्षेत्र लागवडीस शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Tags: #Usdar #silver #Kolhapur #Solapur #sugarcane #rate #factories #drought#कोल्हापूर #उसदर #चांदी #सोलापूर #अन्यत्र #दुष्काळ #शेतकरी #ऊस #कारखाना
Previous Post

अखेर दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार, रश्मी ठाकरेंवर केली सडकून टीका

Next Post

सोलापूर । 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सोलापूर । 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

वार्ता संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697