सोलापूर : सुक्षेत्र श्रीशैल येथे श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे द्वादश पीठारोहण व जन्म सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजित राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विभागाचे स्वागत अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. Prime Minister Narendra Modi along with Deputy Chief Minister Devendra Fadnavis will attend the Shrishail Peetha program
शनिवारी मुंबई येथे नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, मैंदर्गीचे निलकंठ शिवाचार्य महास्वामी व समाजसेवक कांतप्पा धनशेट्टी आदी शिष्टमंडळातील सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दि. १० ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलनच्या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सध्या श्रीशैल पिठाचे जगद्गुरूंचे येडूर ते श्रीशैल असे ५६० किलोमीटरचे पदयात्रा चालू असून ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा श्रीशैल येथे पोहचणार आहे. दरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. श्रीशैल येथे दि.१ डिसेंबर ते १० जानेवारी पर्यंत जगद्गुरुंचे ४१ दिवसांची धार्मिक अनुष्ठान, रुद्रहोम,इष्टलिंग महापूजा, जगद्गुरुंच्या लिंगोद्भव मूर्तीचे बिल्वार्चन, धर्म प्रबोधन, तुलाभार कार्यक्रम व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
१० ते १५ जानेवारी या पाच दिवशी राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन, राष्ट्रीय वीरशैवागम समावेश, तेलगू, मराठी, कन्नड भाषा बंधुत्व कार्यक्रम, भक्तनिवास ,हॉस्पिटल महासभामंडप, वसती शाळा, संस्कृत गुरुकुल यांचे पायाभरणी कार्यक्रम, हिंदी, इंग्रजी, तेलुगु भाषेत अनुवादित केलेले सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध मान्यवर येणार असल्याची माहिती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.
● न्यायालयीन कोठडी : अखेर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणात आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडला होता. प्रेक्षकांना व चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. असल्याच्या आरोप त्यांच्यावर होता.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांनी तत्काळ जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर दुपारी सुनावणी होणार आहे. त्यांच्यावर ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. आव्हाडांनी या चित्रपटात विद्रुपीकरण झाल्याचा आरोप केलेला आहे.