सोलापूर : टेम्पो ट्रॅव्हलरने कारला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावरील पेनुर हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर काल शुक्रवारी (ता. 11) रात्री दहा वाजता झाला आहे. Tempo-traveler accident in Mohol, three killed and two injured Pandharpur
प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५ वर्षे), सुरज दिलीप कदम (वय २५ वर्षे), ऋषिकेश रामकृष्ण साखरे (वय २५ वर्षे तिघेही रा. विजापुर गल्ली, पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत, तर दत्तात्रेय श्रीमंत कोकाटे ( रा तांबोळे) व दत्तात्रेय बाळासाहेब देवकते ( रा कोन्हेरी) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
काल मध्यरात्री पेनुर हद्दीत गजानन पेट्रोल पंपाचे जवळ हा अपघात झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथे सलुनचा व्यवसाय करणारे आहेत. दत्ताराम नारायण जाधव हे पंढरपूर येथे मुलगी व जावई यांना भेटण्यासाठी आले होते.
दरम्यान शुक्रवारी (दि. ११ ) दुपारी त्यांचा जावई प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५) व त्याचे मित्र सुरज दिलीप कदम (वय २५ ) व ऋषीकेश रामकृष्ण साखरे (वय २५ रा तिघे पंढरपूर) असे मिळून कारमधून सोलापूर येथे शोरूमला जावून येतो म्हणून गेले होते. सोलापूरहून परत पंढरपूरकडे येत असता हा अपघात झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मोहोळ ते पंढरपूर रोडवर विरूध्द दिशेने जाणारे टॅम्पो ट्रॅव्हलने धडक दिली असून त्यात कार मधील तिन इसमांना मार लागून ते गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले . या आपघातातदोन्ही वाहनाचे मिळून अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले.
दत्ताराम नारायण जाधव (वय ६५ धंदा सलुन व्यवसाय रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार टेम्पो चालकावरती गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास आपघात पथकाचे सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.
□ बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड
सोलापूर येथील वकिलांच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड हे अध्यक्ष झाले आहेत. परंतु, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदारपदी विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना यश मिळाले. ॲड. गायकवाड यांच्या पॅनेलमधील सहसचिव पदाच्या उमेदवार ॲड. अनिता रणशृंगारे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. विधी विकास पॅनेलचे प्रमुख ॲड. राजेंद्र फताटे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे.