कोल्हापूर : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे. कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वप्नीलला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच कोल्हापूरमध्ये आनंद व्यक्त केला आहे. या पुरस्काराचे वितरण 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन येथे होणार आहे. ‘Arjuna’ award announced to Swapnil Patil, joy in Kolhapur
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रहिवासी असणार्या स्वप्निल पाटीलचा जन्म 6 जानेवारी 1998 रोजी झाला. वयाच्या सहाव्या वर्षी वाढदिनी सायकलला अपघात झाल्याने यात त्याच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले होते. उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे डाव्या पायाला कायमस्वरूपी अपंगत्व आले. सहा महिने चालायला येत नव्हते. यानंतर हळूहळू चालण्याचा सराव त्याने सुरू केला.
वडील संजय पाटील, आई लता पाटील व मोठी बहीण अनुराधा पाटील यांच्या पाठबळ आणि प्रोत्साहनामुळे स्वप्निल खेळाबरोबरच शिक्षणही पूर्ण केले. प्रतिभानगरातील सरस्वती चुणेकर विद्यामंदिर व नानासाहेब गद्रे हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बी.ए. पदवीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शहाजी महाविद्यालयात झाले. सध्या स्वप्निल बंगळूर येथे शरद गायकवाड यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
विशेष म्हणजे यंदा एकाही क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार किंवा खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नाही. क्रिकेट विश्वातून फक्त सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची केवळ द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीत (लाईफटाईम कॅटेगरी) निवड झाली आहे. दिनेश लाड यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला प्रशिक्षण दिलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पॅरालिम्पिकमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. राज्य सरकारनेही त्याचा गौरव केला असून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोल्हापूर कुस्तीसह, नेमबाजी आणि जलतरणामध्ये मोठी परंपरा आहे. पॅरालिम्पिकमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. राज्य सरकारनेही त्याचा गौरव केला असून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, गणपतराव आंदळकर, शैलजा साळोखे हे अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. दरम्यान, वडील संजय पाटील हेच स्वप्नीलचे जलतरण प्रशिक्षक असल्याने पुरस्कारामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील 2006 पासून जलतरण करत आहे.
वडील संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण तलावात चालण्याचा सराव सुरू केला. यातून जलतरण खेळाबद्दलची आवड निर्माण झाली. यानंतर पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावात प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले.
शालेय जीवनापासूनच तो जलतरण करत आहे. 2008 मध्ये त्याने राष्ट्रीय पातळीवर दोन कांस्यपदके भारतीय संघाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्याला 2011 मध्ये भारतीय संघात प्रवेश मिळाला.
भारतीय संघात निवड होताच त्याने अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत चार सुवर्णपदक जिंकत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर 2014 मध्ये दक्षिण कोरियातील आशियाई गेम्समध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदक जिंकले.