Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

श्रद्धाचे 35 तुकडे प्रकरण – ‘लव्ह जिहाद’ च्या अँगलनेदेखील तपास करावा

Shraddha Walker's 35 piece case - 'Love Jihad' angle should also be investigated MLA Ram Kadam Aftab Poonawala

Surajya Digital by Surajya Digital
November 15, 2022
in Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
श्रद्धाचे 35 तुकडे प्रकरण – ‘लव्ह जिहाद’ च्या अँगलनेदेखील तपास करावा
0
SHARES
147
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ केवळ एक व्यक्ती असे कृत्य करु शकत नाही

 

मुंबई : श्रद्धा वालकरचे तिचा बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावालाने 35 तुकडे करत हत्या केली आहे. या विरोधात भाजपचे आमदार राम कदमांनी आंदोलन केले आहे. पोलिसांनी या घटनेचा लव्ह जिहादच्या अँगलने देखील तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ एक व्यक्ती असे कृत्य करु शकत नाही, नक्कीच यात आणखी लोकांचा सहभाग असला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी याचा कसून तपासा करावा, असे कदम म्हणाले आहेत. Shraddha Walker’s 35 piece case – ‘Love Jihad’ angle should also be investigated MLA Ram Kadam Aftab Poonawala

 

या हत्येसंदर्भात भाजपचे आमदार राम कदम यांनी भाष्य केले आहे. या हत्येमागे लव्ह जिहादचे काही नाते आहे का, याचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा, असे राम कदम म्हणाले आहेत.

 

ज्या निर्दयतेने श्रद्धा हिचा खून करण्यात आला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले गेले, त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. ही हत्या खासगी असू शकत नाही. या हत्येमागे लव्ह जिहाद सारखा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करावा. वारंवार अशा स्वरुपाच्या घटना देशात घडत आहेत. त्यामुळे यामागे कोण आहे, कोणाचे षड्यंत्र आहे, त्याचा पर्दापाश झाला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण हत्येपुरते गृहीत न धरता, त्याची पाळेमुळे लव्ह जिहादपर्यंत जातात का, हे शोधणे गरजेचे आहे. आम्ही श्रद्धाच्या कुटुंबाच्या मागे उभे आहोत. श्रद्धाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे यावेळी राम कदम म्हणाले.

 

हिंदू नेहमी संयमी राहिले आहेत. दरवेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नका.
आम्ही श्रद्धाच्या कुटुंबाच्या मागे उभे आहोत. त्यामुळे या प्रकरणाता लव्ह जिहादच्या दृष्टीने तपास झाला पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी लावून धरली. राम कदम यांच्या नेतृत्वात मुंबईत श्रद्धा वालकरच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले होते.

 

क्या यें #lovejihad का मामला है ? हम देल्ही पुलिस से निवेदन करते है की वे वसई निवासी #श्रधा के मर्डर के बारे में तफ़तिश करे और खंगाले की आरोपी धर्म परिवर्तन करना चाहता था ? और श्रद्धा ने मना किया ? क्या यही वजह थी ? क्या यह लवजिहाद का मामला है

— Ram Kadam (@ramkadam) November 14, 2022

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी ट्विट करत सांगितले की “हे #लव्हजिहादचे प्रकरण आहे का? वसईतील रहिवासी श्रद्धा हिच्या हत्येचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा आणि आरोपी धर्मांतर करू इच्छित होता? आणि श्रद्धाने नकार दिला? हे कारण होते का? हा लव्ह जिहादचा मामला आहे का? असं ट्विटमध्ये म्हणटं आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

》 श्रद्धाच्या हत्याकांडावरून उडला प्रियकरावरील विश्वास, सहा महिन्यानी लागला तपास

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे. मुंबईतल्या श्रद्धा वालकरची प्रियकर आफताबने दिल्लीत हत्या केली आहे. आफताब व श्रद्धाची मालाडमधील कॉल सेंटरमध्ये मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण घरच्यांच्या विरोधामुळे ते दिल्लीत लिव्ह-इनमध्ये राहत होते. श्रद्धाला लवकर लग्न करायचे होते. त्यामुळे आफताबने 18 मे रोजी तिची हत्या केली. मृतदेहाचे 35 तुकडे केले व वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

 

राष्ट्रीय महिला आयोगाने श्रद्धा वालकर हत्याकांडाची दखल घेतली आहे. ‘ही एक भयानक घटना आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना सविस्तर अहवाल मागितला आहे. प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीला कठोर शिक्षा केलीच पाहिजे, ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील’, असे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. दिल्लीत आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाची तुकडे करून विल्हेवाट लावली.

 

वसईतील माणिकपूर मधील 27 वर्षीय तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रद्धा असे मृत तरुणीचे नाव असून आफताब अमीन पूनावाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

श्रद्धा वालकर ही तरुणी वसईतील संस्कृती अपार्टमेंट या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती. श्रद्धाचे कुटुंबीय हे वसईतील मूळ रहिवाशी आहे. श्रद्धाचे बालपण याच संस्कृती अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील घरात गेले आहे. तिच्या घरात वडील आणि भाऊ राहतात.

 

वसई गावातील जिजी कॉलेजच्या बाजूला संस्कृती अपॉईंटमेंट आहे. या अपॉईंटमेंटमध्ये श्रद्धा वालकर आपल्या कुटुंबासोबत राहत असताना 2019 मध्ये मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब हे दोघे मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते. येथे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी आपल्या प्रेमाची माहिती घरच्यांना दिली. मात्र घरच्यांनी विरोध केल्याने दोघेही दिल्लीला पळून गेले आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दिल्लीमध्ये छतरपूर भागात दोघे एकत्र रहात होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते. मात्र श्रद्धा लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत असल्याने आफताबने तिचा खून केला.

 

They came to Mehrauli PS & we immediately initiated legal action. They had pvt jobs in Mumbai & the man had started working here. He has been identified as Aftab Poonawalla. They got together via dating app, were in a live-in relationship in Mumbai & continued here: Ankit Chauhan pic.twitter.com/gdjA4XOSMp

— ANI (@ANI) November 14, 2022

 

अनेक दिवस झाले तरी मुलीशी संपर्क न झाल्याने आणि सोशल मीडियावर तिने एकही पोस्ट न टाकल्याने श्रद्धाच्या आई – वडिलांना संशय आला. श्रद्धाचे वडील विकास मदन वॉकर यांनी थेट दिल्ली गाठली. आफताब आणि श्रद्धा रहात असलेल्या फ्लॅटवरही ते गेले. मात्र तिथे कुलूप असल्याचे पाहून त्यांनी मेहरौली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा समजून तपास सुरू केला. मात्र आफताबला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले.

लिव्ह-इनमध्ये असताना श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत असे. यावरून आमच्यात भांडणे होत होती. 18 मे रोजीही लग्नावरून आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. सततच्या कटकटीने कंटाळल्याने आपण श्रद्धाचा गळा आवळून खून केला आणि तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. यानंतर हे तुकटे फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर दिल्लीतील अनेक भागात हे तुकडे फेकले, अशी माहिती आफताबने पोलीस चौकशीत दिली.

श्रद्धाच्या खुनाचा पत्ता लागू नये म्हणून आफताबने अत्यंत थंड डोक्याने विचार करत तिच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. यासाठी त्याने 300 लीटरचा नवीन फ्रिजही खरेदी केला. यानंतर रोज दुपारी दोन वाजता फ्लॅटमधून बाहेर निघायचा आणि मृतदेहाचा एक-एक तुकडा फेकून येत होता. 16 दिवस त्याचा हा सिलसिला सुरूच होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

हे तुकडे तो रोज रात्री 2 वाजता घरातून बाहेर पडायचा आणि एक-एक करून ते मेहरूली जंगलात टाकत होता. तो सलग 18 दिवस हे तुकडे जंगलात टाकत होता. जंगलात हे तुकडे टाकत असताना त्याला वाटत होत की, आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांना कळणार नाही. मात्र 6 महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, डेक्सटर वेब सिरीज पाहिल्यानंतर आफताबने ही हत्या केली. त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना या वेबसीरिजमधून आली, असं सांगितलं जात आहे.

 

दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावालाला मेहरौली जंगलातील त्या ठिकाणी नेले, जिथे त्याने श्रद्धाच्या शरीराच्या काही भागांची कथितपणे विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आफताबने पोलिसांना सांगितले की, ‘येस आय किल्ड हर’ म्हणजे होय मी त्याला मारले.

 

आफताबने श्रद्धाचा फोन फेकून दिला आहे असं, दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. तिचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले जात आहे, जेणेकरून तो परत मिळवता येईल. पोलिसांचे म्हणणे आहे की, श्रद्धाचे इन्स्टाग्राम अकाऊंट वरून समजत आहे की, ती जूनपर्यंत जिवंत होती.

Tags: #ShraddhaWalker's #35piece #case #LoveJihad #angle #investigated #MLA #RamKadam #AftabPoonawala#श्रद्धावालकर #35तुकडेप्रकरण #लव्हजिहाद #अँगलनेदेखील #तपास #घाटकोपर #आमदार #रामकदम
Previous Post

ठरवलं तर पंढरपूर व मोहोळ तालुक्यात परिवर्तन करू शकतो : खा. धनंजय महाडीक

Next Post

GST सर्व राज्यांची परवानगी आवश्यक; पेट्रोल होणार 75 रुपये लिटर !

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
GST सर्व राज्यांची परवानगी आवश्यक; पेट्रोल होणार 75 रुपये लिटर !

GST सर्व राज्यांची परवानगी आवश्यक; पेट्रोल होणार 75 रुपये लिटर !

वार्ता संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697