सोलापूर : पंधरा दिवसात मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दखल घेतली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील लिपीक राजू गाडेकर ,संजय कांबळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांसह 20 जणांची उचलबांगडी केलीय. CEO Dilip Swamy became active: Action against employees in various departments
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लिपीक राजू गाडेकर ,संजय कांबळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. बहूचर्चीत आणि तक्रार असणाऱ्या २० कर्मचाऱ्यांची मुख्यालयातंर्गत बदली करण्याची कारवाई सीईओ दिलीप स्वामी यांनी केली आहे.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या लाच प्रतिबंध कारवाईनंतर सीईओ स्वामी यांनी कडक धोरण अंमलात आणले आहे. वादग्रस्त आणि एकाच टेबलावर ५ वर्षापेक्षा अधिक कार्यासन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली मुख्यालयातंर्गत करण्यात आले आहे. कनिष्ठ प्रशासनधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ०३, कनिष्ठ सहाय्यक १५ आशी बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेले लाचेचे प्रकरण तसेच इतर काही कारणांमुळे जिल्हा परिषदेतील कामाच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना न भेटता थेट अधिकारी यांनाच भेटावे, असे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जि. प. तील विविध विभागांच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सबळ कारणाशिवाय जे कर्मचारी फाइल प्रलंबित ठेवतील, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची सूचना सीईओ स्वामी यांनी झेडपीच्या विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
जी प्रकरणे कायदेशीर व नियमानुसार आहेत ती वेळेत मार्गी लावावीत. जी प्रकरणे होत नाहीत अशी प्रकरणे तत्काळ फेटाळून संबंधितांना वेळेवर कळवावे. विनाकारण फाइल तुमच्याकडे प्रलंबित ठेवू नका, अन्यथा तुमच्यावरच कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना परस्पर भेटू नये. विभाग प्रमुखांनी स्वतः अभ्यागतांना भेटावे यासाठी शिस्त लावण्याची सूचनाही सीईओ स्वामी यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामे पारदर्शक व गतिमान होण्यासाठी विभाग प्रमुखांना मी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. काही कर्मचारी आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. सुधारणा करण्यासाठी त्यांना शेवटची संधी दिली आहे. ही संधी देऊनही सुधारणा न करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे या अगोदर सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले होते.