मोहोळ : लांबोटी येथे आज गुरुवारी सकाळी एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडले असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला तिचा खून झाला की तिने आत्महत्या केली याबाबतउलट सुलट चर्चा सुरू आहे. Mohol found the dead body of a woman while going for Raksha immersion in Lamboti river
या महिलेची ओळख पटवणे आणि याचा तपास करणे हे पोलीसासमोर आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज फिर्यादी रक्षा विसर्जनासाठी त्या ठिकाणी गेला असता यास सदर महिलेचा मृतदेह आढळून आला. सीना नदीपात्रामध्ये लांबोटी येथील जुन्या पुलाजवळ राख टाकून पाण्यामध्ये हात धुवत असताना एक प्रेत असल्याचे दिसून आले.
सदर प्रेत स्त्री जातीचे असून त्या मयत महिलेच्या अंगावर राखाडी रंगाचा स्वेटर, काळ्या रंगाचा टॉप व जांभळ्या रंगाचा पायजमा आहे. सदर महिला २५ ते ३० वयाच्या दरम्यान असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. त्यामुळे तिची ओळख पटवण्यासाठी मोहोळ पोलिसांकडून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दुधनीच्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी
सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून महादेव श्रीमंत कांबळे (वय २५ रा.दुधनी, ता. अक्कलकोट) यांस १० वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.पी.आव्हाड यांनी ठोठावली.
गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी यातील आरोपीने २९ सप्टेंबर २०१८ रोजी यातील पिडीतेस लग्नाचे आमिष दाखवून सोलापुरातील कॉलेज परिसरातून पळवून नेले होते. त्यानंतर अहमदनगर, दौंड आणि दुधनी या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. दरम्यान इकडे पिडीता वस्तीगृहात हजर नसल्याचे वस्तीगृहाच्या अधिक्षीका यांनी त्याबाबत पिडीतेच्या आईला फोन करुन माहिती दिली होती.
परंतु पिडीता आई वडीलांकडे गेली नसल्यााचे समजले. यापूर्वीही आरोपीने पिडीतेला पळवून नेल्याची माहिती पिडीतेच्या आईने त्यांना दिली. त्यानंतर वस्तीगृहाच्या अधिक्षीका यांनी जेलरोड पोलीसात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी या प्रकरणात महादेव कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक रोहित दिवसे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीता,फिर्यादी आणि डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली. समोर आलेला साक्षीपुरावा व सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस १० वर्षाची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील रकमेपैकी ५ हजार रुपये नुकसान भरपाई पिडीतेला देण्याचे आदेशात नमुद आहे.
या खटल्यात सरकारच्या वतीने ॲड. एस.ए.डोके यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड .सतिश शेटटी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून .हे.कॉ. मैंदर्गी व म.पो.कॉ. जहागीरदार यांनी मदत केली .